धर्म
Trending

​’चलो पोहरागड’चा नारा! २५ मार्च रोजी अखिल भारतीय बंजारा जनजागृती मेळाव्याचे भव्य आयोजन.

(प्रतिनिधी सुरज पवार):

बंजारा ब्रिगेडच्या वतीने आयोजित ‘अखिल भारतीय बंजारा जनजागृती मेळावा’ येत्या २५ मार्च २०२६ रोजी वाशिम जिल्ह्यातील पवित्र तीर्थक्षेत्र पोहरागड येथे संपन्न होणार आहे. या मेळाव्याच्या नियोजनासाठी नुकतीच धर्मगुरू आणि महंतांची भेट घेऊन त्यांना रीतसर निमंत्रण देण्यात आले, तसेच मेळाव्याच्या नियोजित जागेची पाहणी करण्यात आली.

​संत बामणलाल महाराज मैदानावरील १० एकर परिसरात हा भव्य मेळावा सायंकाळी ५ वाजता पार पडणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी बंजारा समाजातील विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

​महंतांच्या उपस्थितीत जागेची पाहणी

या मेळाव्याच्या निमित्ताने बंजारा ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी धर्मगुरू आमदार बाबूसिंग महाराज, महंत कबीरदास महाराज, महंत सुनील महाराज आणि महंत सुभाष महाराज यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना मेळाव्याचे निमंत्रण दिले. त्यानंतर प्रत्यक्ष मैदानावर जाऊन जागेची पाहणी करण्यात आली.

​प्रमुख उपस्थिती

यावेळी मेळावा संयोजकांसह महंत सुनील महाराज, महंत अनिल महाराज, महंत प्रकाश महाराज, प्रदेश कार्याध्यक्ष रविंद्र भाऊ पवार, प्रदेश सचिव ॲड. पंडित भाऊ राठोड, स्वर चैतन्य आर्केस्ट्राचे संचालक प्रकाश राठोड, APN न्यूजचे संपादक अर्जुन भाऊ पवार, वाशिम जिल्हा अध्यक्ष बाबाराव राठोड, डॉ. सुरेश जाधव व बंजारा ब्रिगेडचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

​बंजारा समाजाच्या जनजागृतीसाठी आयोजित या मेळाव्याची तयारी सध्या युद्धपातळीवर सुरू असून, ‘चलो पोहरागड’ असा नारा देत समाजातील बांधवांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!