महाराष्ट्रलोकल न्यूज़
Trending

एरंडोलमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी…

शोभायात्रा, सांस्कृतिक कार्यक्रम व वैचारिक प्रबोधन.

एरंडोल — येथील पुरा भागातून सालाबादप्रमाणे हिंदुत्व ग्रुप आणि नगरसेवक कृष्णाभाऊ ओतारी मित्र परिवाराच्या वतीने शिवजनमोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला होता. यामध्ये प्रवक्ता अकॅडमीचे विद्यार्थी – पालक व शहरातील शिवप्रेमी मंडळींनी काढलेली शोभायात्रा गावातील मुख्य रस्त्यावरून शिवरायांच्या स्मारकाजवळ आली. याठिकाणी शिवरायांच्या स्मारकाला मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण झाल्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम व वैचारिक प्रबोधनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, शोभायात्रेच्या सुरवातीला पारोळा एरंडोलचे आमदार अमोल चिमणराव पाटील यांच्या हस्ते शिवरायांना माल्यार्पण करून पूजन करण्यात आले. एरंडोलचे नगराध्यक्ष नरेंद्र ठाकूर व सर्व नगरसेवक देखील उपस्थित होते. पारंपरिक वाद्याच्या तालावर शोभायात्रेची सुरवात झाली. विद्यार्थ्यांचे शिस्तबद्ध संचलन, डोक्याला फेटे, भगवे ध्वज, माँसाहेब जिजाऊ आणि शिव – शंभू यांच्या जयघोषाने एकचक्रनगरी दुमदूमली. पुरा भागातून मार्गक्रमण करत एरंडोल शहरातील मुख्य रस्त्यावरून मरीमाता मंदिरापासून शिवरायांच्या स्मारकाजवळ शोभयात्रेचा समारोप झाला. याठिकाणी सर्व मान्यवर व शिवजन्मोत्सव सोहळ्यातील सर्वांनी शिवरायांच्या स्मारकाला गुलाबाचा हार अर्पण करून अभिवादन केले. 

शिवस्मारकाजवळ प्रवक्ता अकॅडमी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम व व्याख्यानाला सुरवात झाली. सर्वप्रथम शिवरायांच्या मूर्तीचे पूजन नगराध्यक्ष नरेंद्र ठाकूर, नगरसेवक प्रा मनोज पाटील, कृष्णा ओतारी व मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी नृत्य, गायन, पोवाडे, भाषण यामधून शिवकार्याचा जागर केला. शिवव्याख्याते लक्ष्मणराव पाटील यांनी शिवजन्म, शिवरायांच्या इतिहासावर प्रकाश टाकला. शेतकरी – कष्टकरी यांची काळजी घेणारे, महिलांच्या सन्मानाची उपाययोजना, जातीभेदाचे निर्मूलन, पर्यावरण विषयक जागृती निर्माण करणारे शिवराय खऱ्या अर्थाने रयतेचे राजे होते असे प्रतिपादन व्याख्याते पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी शिवकार्याचा जागर करणाऱ्या विद्यार्थांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

सांस्कृतिक कार्यक्रम व व्याख्यानाचे आयोजन प्रवक्ता अकॅडमीच्या माध्यमातून करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हिंदुत्व ग्रुप, नगरसेवक कृष्णाभाऊ ओतारी मित्र परिवार व प्रवक्ता अकॅडमीच्या सर्व टीमने परिश्रम घेतले. कार्यक्रमाला विद्यार्थी – पालक – शिवप्रेमी नागरिकांची लक्षणीय उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रवक्ता अकॅडमीचे संचालक डॉ विजय पाटील यांनी केले.

🚀 Shuru App – Referral & Earn सुरू!
आता फक्त न्यूज पोस्ट नाही… तर शेअर करूनही कमवा! 💰
📢 कोणत्याही न्यूजचा लिंक WhatsApp | Instagram | Facebook | Telegram वर शेअर करा
👉 तुमच्या लिंकवरून झालेल्या Subscription वर 50% Commission थेट तुम्हाला!
🎉 अनेक रिपोर्टर्सनी कमाई सुरू केली आहे…
मग तुम्ही का मागे?
📲 आत्ताच डाउनलोड करा:
https://shuru.co.in/dl/OxbDNK
शेअर करा आणि कमाई सुरू करा! 🔥💸

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!