क्राइमधर्म
Trending

धरणगाव येथील नाथ भक्तांकडून नवनाथ मंदिरातील मूर्ती विटंबनेविरोधात पोलीस व तहसीलदारांकडे अधिकृत निवेदन.

​धरणगाव (प्रतिनिधी):

शेगाव तालुक्यातील मौजे हिंगणा-वैजापूर येथील श्री नवनाथ मंदिरातील मूर्तींची अज्ञात समाजकंटकांनी विटंबना व तोडफोड केल्याची संतापजनक घटना नुकतीच घडली आहे. या घटनेचा धरणगाव तालुक्यातील नाथ भक्तांनी तीव्र निषेध केला असून, दोषींवर कठोर व तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी आज धरणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक तसेच माननीय तहसीलदार साहेब यांना अधिकृत, कायदेशीर व घटनात्मक निवेदन सादर करण्यात आले.

​घटनेचे गांभीर्य आणि धार्मिक भावना

​दिलेल्या निवेदनानुसार, शेगाव तालुक्यातील वैजापूर येथे २७ व २८ जानेवारी २०२६ दरम्यान अज्ञात व्यक्तींनी मंदिरात प्रवेश करून मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, कानिफनाथ, जालिंदरनाथ यांच्यासह नवनाथांच्या मूर्तींची विटंबना केली. या घटनेमुळे संपूर्ण नवनाथ संप्रदायामध्ये संतापाची लाट असून, धरणगाव तालुक्यातील भक्तांनी संघटित होऊन प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.

​’हा लढा न्यायासाठी आणि वारशासाठी’

​यावेळी श्री चैतन्य नवनाथ सिद्ध आश्रम संस्थान (कोळपिंप्री) चे बालकनाथ (दिनेश जिजाबराव काटे) यांनी आपली भावना व्यक्त केली. ते म्हणाले, “हा लढा केवळ एका घटनेपुरता मर्यादित नाही, तर नवनाथ संप्रदायाच्या पवित्र श्रद्धेच्या संरक्षणासाठी, धर्मसन्मानासाठी आणि आपल्या सांस्कृतिक वारशाच्या पावित्र्यासाठी उभारलेला एक पवित्र संकल्प आहे. भविष्यात अशा घृणास्पद कृत्ये पुन्हा घडू नयेत, हीच आमची ठाम मागणी आहे.”

​कायदेशीर आणि घटनात्मक मागणी

​निवेदनात भारतीय संविधानातील अनुच्छेद २५, २६, २९ व ५१-अ तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चा संदर्भ देण्यात आला आहे. प्रशासनाने सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे दोषींची ओळख पटवून त्यांना तातडीने अटक करावी, अशी मागणी धरणगावच्या नाथ भक्तांनी केली आहे.

​पारदर्शकतेसाठी पुराव्यांचे प्रसारण

​प्रशासकीय प्रक्रियेत पारदर्शकता राहावी आणि समाजजागृती व्हावी या उद्देशाने, निवेदन सादर करतानाचे छायाचित्रे व व्हिडिओ पुराव्यासह प्रसारित करण्यात आले आहेत.

​निवेदन सादर करताना धरणगाव परिसरातील मोठ्या संख्येने नाथ भक्त उपस्थित होते. “॥ नवनाथांचा जयजयकार ॥” आणि “॥ धर्म, श्रद्धा आणि न्यायासाठी अखंड एकजूट ॥” अशा घोषणांनी तहसील कार्यालय परिसर दणाणून गेला होता.

निवेदन मूळ प्रत. 👇

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!