क्राइम

मालेगाव तालुक्यातील चिमुकलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणाचा धरणगावात निषेध; तहसीलदारांना निवेदन.

धरणगाव (ता.धरणगाव) — नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात चिमुकल्या मुलीवर झालेल्या अत्याचारानंतर निर्घृण हत्या झालेल्या संतापजनक घटनेचा धरणगावात तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. या प्रकरणातील आरोपीवर कठोरात कठोर कारवाई व्हावी तसेच प्रकरणाची सुनावणी फास्ट-ट्रॅक न्यायालयात करण्याची मागणी समस्त सुवर्णकार समाज व सराफ असोसिएशन, धरणगाव यांच्या वतीने तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
सुवर्णकार समाज व सराफ असोसिएशनच्या प्रतिनिधींनी दिलेल्या निवेदनात, “ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी असून समाजातील वाढत्या विकृत मानसिकतेचे भीषण रूप आहे. पीडित कुटुंबाला न्याय मिळावा ही सर्वांची सामाजिक जबाबदारी आहे,” असे नमूद करण्यात आले.
हे निवेदन धरणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. सुनील पवार तसेच धरणगाव तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार श्री. संदीप मोरे यांना देण्यात आले.
निवेदन देताना सुवर्णकार समाजातील श्री. ईश्वर शेठ सोनार, श्री. दत्तात्रय शेठ सोनार, श्री. दीपक शेठ सोनार, तसेच शहरातील विविध क्षेत्रातील श्री. लक्ष्मण पाटील, श्री. नंदू धनगर, श्री. मोहित पवार यांच्यासह विविध समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!