महाराष्ट्रयुवा

राज्यस्तरीय सन्मानाने धरणगावचा आदर्श कामगार तलाठी गौरवला.

अहिल्यानगर (ता.२४ ऑगस्ट) – धरणगाव येथील सुपुत्र व मा. माजी सैनिक श्री गणेश नारायण महाजन (तलाठी, ग्राम महसूल अधिकारी, खोरवडी, ता. दौंड, जि. पुणे) यांना राज्यस्तरीय आदर्श कामगार सन्मान २०२५ ने गौरविण्यात आले. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना हा मानाचा पुरस्कार प्रदान केला जातो.

हा सन्मान सोहळा माऊली संकुल सभागृह, सावेडी रोड, अहिल्यानगर येथे रविवारी (दि. २४ ऑगस्ट २०२५) सकाळी ११ वाजता संपन्न झाला. कार्यक्रमाला सरपंच सेवा संघाचे समर्थक बाबासाहेब पावसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली तसेच शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाघचौरे, ग्रामसेवक नेते एकनाथ टाकणे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणून यादवराव पावसे-पाटील व रोहित पवार यांचीही प्रमुख उपस्थिती लाभली. या दिग्गज मान्यवरांच्या शुभहस्ते श्री गणेश महाजन यांना सन्मानपत्र व मानचिन्ह प्रदान करण्यात आले.

या सन्मानामुळे धरणगावसह संपूर्ण जिल्ह्याचा अभिमान वाढल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!