लोकल न्यूज़

पाळधीत श्री संत सेना महाराज पुण्यतिथी उत्साहात संपन्न.

पाळधी ता धरणगाव येथे जिवाजी महाले नाभिक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने श्री संत सेना महाराज पुण्यतिथी निमित्त श्रीराम मंदिर सभागृहात प्रतिमापूजन जि प सदस्य प्रतापराव गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सत्यनारायण पूजन दिनेश फुलपगार नूतन फुलपगार या नवदांपत्याच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच विजय पाटील उद्योगपती दिलीप पाटील ग्रा.प.सदस्य अनिल कासट अध्यक्ष गणेश फुलपगार उपाध्यक्ष सोनू फुलपगार मच्छू कोळी भूषण पाटील गोकुळ नन्नवरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अ.भा.जिवा सेना धरणगाव ता. उपाध्यक्ष गोपाळ सोनवणे यांनी केले. आभार नितीन फुलपगार यांनी केले यशस्वीतेसाठी जिवाजी महाले नाभिक युवक बहुउद्देशीय संस्थेचे कार्यकर्त्यांसह प्रकाश श्रीखंडे मदन फुलपगार आत्माराम फुलपगार संदीप फुलपगार राज फुलपगार स्वप्निल फुलपगार महेंद्र फुलपगार मिलिंद फुलपगार विजय फुलपगार दीपक पगारे अर्जुन पगारे मंगेश फुलपगार श्याम फुलपगार महेश फुलपगार ज्ञानेश्वर फुलपगार आशिष सोनवणे कैलास फुलपगार लक्ष्मण कुवर गुलाब सोनवणे गोपाल फुलपगार पंकज फुलपगार प्रद्युम फुलपगार आदी सर्व समाज बांधवांनी परिश्रम घेतले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!