खेल

धरणगाव तालुकास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा उत्साहात संपन्न

14 वर्षे आतील मुलींमध्ये साळवे इंग्रजी विद्यालय साळवे प्रथम

धरणगाव येथे क्रिडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य , पुणे. जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय , जळगाव. पंचायत समिती शिक्षण विभाग धरणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय तालुकास्तरीय क्रिडा स्पर्धा अंतगर्त बॅडमिंटन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व खेळाचे नियमांबाबत मार्गदर्शन तालुका क्रिडा समन्वयक श्री एस एल सूर्यवंशी सरांनी केले. या स्पर्धेचे उद्घाटन मा. नगरसेवक व प्रसिद्ध मल्ल श्री भानुदास विसावे व प्रमुख पाहुणे सामाजिक कार्यकर्ते श्री गोरख महाजन यांनी केले .

स्पर्धेचे गुणलेखन लिटील ब्लॉझम स्कूलचे क्रिडाशिक्षक श्री पवन बारी यांनी केले. तर सामन्याचे पंच म्हणून महात्मा फुले हायस्कूलचे क्रिडाशिक्षक श्री एच डी माळी सर जितेंद्र ओस्तवाल विनायक कायंदे ज्ञानेश्वर घुले यांनी काम पाहिले .

 स्पर्धा यशविस्तेसाठी ऋषिकेश महाजन कृष्णा महाजन यांनी सहकार्य केले .

स्पर्धेचे विजेते खालील प्रमाणे :

1) १४ वर्ष आतील मुले :

प्रथम : लिटील ब्लॉझम स्कूल धरणगाव

द्वितीय : पी आर हायस्कूल धरणगाव

2) १४ वर्ष आतील मुली :

प्रथम : साळवे इंग्लिश स्कूल साळवे

द्वितीय : लिटील ब्लॉझम स्कूल धरणगाव.

3) १७ वर्ष आतील मुले :

प्रथम : पी.आर. हायस्कूल धरणगाव

द्वितीय : सा.दा.कुडे विद्यालय धरणगाव .

४) १७ वर्ष आतील मुली :

प्रथम : पी.आर. हायस्कूल धरणगाव .

द्वितीय : जी. पी.एस. इंग्लिश स्कूल पाळधी

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन करून स्पर्धा संपन्न झाल्या

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!