टॉप न्यूज़लोकल न्यूज़
धरणगाव ग्रामीण रुग्णालयात रात्री ९.३० वाजता डॉक्टर, नर्स, कर्मचारी गायब – सर्पदंश पीडित उपचाराविना
सर्पदंश पीडित उपचाराविना
धरणगाव (जि. जळगाव) –तालुक्यातील एकमेव ग्रामीण रुग्णालयात बेफिकीर प्रशासनाचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे. दिनांक ०८/०८/२०२५ शुक्रवारी रात्री ९.३० वाजता सर्पदंश झालेल्या रुग्णाला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचल्यावर डॉक्टर, नर्स, वार्डबॉय किंवा इतर कोणताही कर्मचारी उपस्थित नव्हता.
या गंभीर परिस्थितीमुळे रुग्ण व त्याच्या नातेवाईकांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागले. धरणगाव शहर व तालुक्यातील एकमेव रुग्णालयात वैद्यकीय कर्मचारीच उपलब्ध नसणे ही चिंताजनक बाब असून, स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
- पत्रकार राजेंद्र वाघ यांनी हा प्रकार व्हिडिओद्वारे नोंदवून प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.त्यांनी वैद्यकीय प्रशासनास तातडीने कायमस्वरूपी एक डॉक्टर नेमण्याची मागणी केली आहे.




