धर्म
Trending

जळगाव येथे वाहनफेरीत दुमदुमला हिंदुत्वाचा जयघोष !

वाहनफेरीला नवनिर्वाचित नगरसेवकांसह शेकडो धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

हिंदु राष्ट्र-जागृती सभेनिमित्त वाहनफेरीचे आयोजन !

जळगाव – हिंदूंवर होणारे अन्याय आणि अत्याचार उघड करण्यासाठी, धर्मशिक्षणाने हिंदूंना संघटित करणे आणि ‘हिंदु राष्ट्र स्थापने’ची पायाभरणी करण्यासाठी हिंदू जनजागृती समिती आणि समस्त हिंदुत्वावरी संघटना यांच्या वतीने आयोजित हिंदू राष्ट्र-जागृती सभेच्या प्रसारासाठी शहरात वाहनफेरीचे आयोजन करण्यात आले होते. यात शेकडो हिंदुत्वनिष्ठ आणि धर्मप्रेमींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. फेरीत भगवे ध्वज, भगवे फेटे, टोप्या घातलेले हिंदू आणि ‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् !’, ‘भारत मातेचा विजय असो !’, ‘हिंदू एकजुटीचा विजय असो !’, ‘हिंदूंनो जागे व्हा !’, ‘वंदे मातरम् !’ अशा घोषणांनी शहर भगवेमय झाले. या वातावरणात शौर्य आणि चैतन्याची लहर उसळली.

 फेरीसाठी सनातन संस्थेच्या सद्गुरु स्वाती खाड्ये यांची विशेष उपस्थिती लाभली. तसेच या फेरीत भाजप, शिवसेना उभाठा, शिवसेना शिंदे गट, शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान , यासह विविध हिंदुत्ववादी या संघटना व मान्यवर मंडळी सहभागी झाले होते.

 प्रारंभी बिग बाजार नेहरू चौक, येथे धर्मध्वजाचे पूजन जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष श्री. सतीश मदाने आणि सनातन संस्थेचे धर्म प्रसारक सदगुरु नंदकुमार जाधव यांच्या हस्ते झाले. 

हि फेरी, टॉवर चौक, चित्रा चौक, श्री इच्छापूर्ती गणेश जवळ श्याम कोगटा यांनी ध्वज पूजन केले, कोर्ट चौक येथे अधिवक्ता मंडळाने स्वागत केले, गणेश कॉलनी मध्ये नगरसेवक सौं दीपमाला काळे, चंद्रशेखर अत्तरदे, यांनी फेरीचे स्वागत केले, सुकृती पॅनल जवळ नगरसेवक मनोज चौधरी तर पिंप्राळा चौकात माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी सरबत वितरणाचे नियोजन केले होते.

स्वागतकार्‍यांनी फुले उधळली व रांगोळ्या काढल्या होत्या.. 

पिंप्राळा येथील शिवस्मारकच्या समारोपावेळी हिंदु जनजागृती समितीच्या कु. रागेश्री देशपांडे यांनी 1 फेब्रुवारी रोजी मानराज पार्क येथे होणाऱ्या सभेत मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले. 

वाहन फेरीत उपस्थित मान्यवर !

 नवनिर्वाचित नगरसेवक, मनोज चौधरी,राहुल पाटील, कविता पाटील, 

कुलभूषण पाटील,श्याम कोगटा कैलास अप्पा सोनवणे, प्रतीक्षा सोनवणे,कल्पेश सोनवणे,मुकुंदा सोनवणे, दीपमाला काळे, 

माजी महापौर सीमा भोळे,उज्वला बेंडाळे 

अतुल बारी, हें सर्व नगरसेवक उपस्थित होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!