साळव्यात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.

साळवे येथील साळवे इंग्रजी विद्यालयात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी जूनियर विभागाच्या शिक्षिका कांचन अत्तरदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून ग्रासू मंडळाचे चेअरमन डॉ. गिरीश नारखेडे, खजिनदार डॉ. चंद्रकांत नारखेडे, सचिव रमेश बोरोले, सदस्य लीलाधर नारखेडे, जी. एन. पाटील, संजय नारखेडे, तसेच मुख्याध्यापक एस. डी. मोरे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर सुंदर कवायत सादर करून उपस्थितांची मने जिंकली. त्यानंतर वि. का. सोसायटीचे चेअरमन किशोर ब-हाटे यांच्या हस्ते सोसायटीत ध्वजारोहण करण्यात आले.
प्रभातफेरीद्वारे विद्यार्थी गावात गेले. ग्रामपंचायतच्या वतीने झेंडा चौकात सरपंच सौ. आशा कोल्हे यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. ई दहावी व ई-बारावीच्या विद्यार्थ्यांना व पालकांना परीक्षा कॉपीमुक्त ठेवण्याची प्रतिज्ञा घेण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, नाट्यछटा, नृत्य तसेच संविधानावर आधारित प्रभावी भाषणे सादर केली.
विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट सादरीकरणाबद्दल पालक व ग्रामस्थांनी रोख बक्षिसे देऊन त्यांचा गौरव केला. उत्कृष्ट बीएलओ म्हणून सन्मान झालेल्या डी टी मोरे यांचा सरपंचांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी तंबाखूमुक्त अभियान, कुष्ठरोग निवारण, कॉपीमुक्त अभियान व तंटामुक्ती याबाबत शपथ घेण्यात आली.
कार्यक्रमास उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी व सदस्य, ज्येष्ठ नागरिक, पालक, बालगोपाल, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




