यवतमाळ: पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते रुग्णवाहिकांचे लोकार्पण; आरोग्यसेवेला मिळणार गती

हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि थोर क्रांतीकारक नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीचे औचित्य साधून यवतमाळ येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी राज्याचे मृदा व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. संजयभाऊ राठोड यांनी उपस्थित राहून दोन्ही महान नेत्यांच्या स्मृतींना अभिवादन केले व त्यांच्या कार्याला उजाळा दिला.

या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे यवतमाळकरांच्या आरोग्यसेवेसाठी करण्यात आलेले रुग्णवाहिकांचे लोकार्पण. श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ताफ्यात नव्याने दाखल झालेल्या अत्याधुनिक रुग्णवाहिकांचे लोकार्पण ना. संजयभाऊ राठोड यांच्या हस्ते करण्यात आले.
तातडीच्या आरोग्यसेवेसाठी मोठा निर्णय
यावेळी बोलताना पालकमंत्री संजय राठोड म्हणाले की, “शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना आपत्कालीन परिस्थितीत तातडीने सेवा मिळणे आवश्यक आहे. या नवीन रुग्णवाहिकांमुळे दुर्गम भागातील आणि आपत्कालीन स्थितीतील रुग्णांना वेळेवर उपचार मिळण्यास मदत होईल, ज्यामुळे जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम आणि वेगवान होईल.”
या रुग्णवाहिकांमुळे केवळ यवतमाळ शहरच नव्हे, तर संपूर्ण जिल्ह्यातील गरीब व गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. कार्यक्रमाला स्थानिक लोकप्रतिनिधी, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बातमी लेखन:
सुरज सुधाकरराव पवार
जिल्हा प्रतिनिधी, यवतमाळ
मो. ९३५०२३६१२१




