राज्य मंत्री इंद्रनील नाईक व मा. मंत्री शिवाजीराव मोघे यांच्या उपस्थितीत महात्मा मुंगसाजी आश्रम शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न.

मरसूळ (ता. पुसद) येथील महात्मा मुंगसाजी आश्रम शाळेत सन २०२६ चे वार्षिक स्नेहसंमेलन व सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे माजी मंत्री शिवाजीराव मोघे तसेच राज्य मंत्री इंद्रनील नाईक हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली. विशेषतः ‘उडान २०२६’ या उपक्रमात सहभागी झालेल्या यवतमाळ जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे मा. मंत्री शिवाजीराव मोघे व राज्य मंत्री इंद्रनील नाईक यांनी कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल त्यांचा सत्कार करून पुढील शैक्षणिक व सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच संस्कार, शिस्त आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचा सल्ला दिला. आश्रम शाळा ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे महत्त्वपूर्ण केंद्र असून अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जातो, असे मत त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल शाळेच्या शिक्षकवर्गाचे व व्यवस्थापनाचे उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन केले.
प्रतिनिधी : सुरज सुधाकरराव पवार यवतमाळ | सनातन सारथी न्यूज मोबाईल : ७३५०२३६१२१




