स्वास्थ पहल उपक्रमाद्वारे सनसश्योर एनर्जीची एरंडोल मध्ये मोफत आरोग्य सेवा.

स्वास्थ पहल उपक्रमाद्वारे सनसश्योर एनर्जीची एरंडोल मध्ये मोफत आरोग्य सेवा
विशेष प्रतिनिधी – तुषार शिंपी एरंडोल
एरंडोल, भारतामधील अग्रगण्य अक्षय ऊर्जा विकासक असलेल्या सनसश्योर इनर्जीने एरंडोल परिसरात आपल्या सी एस आर उपक्रम स्वस्त पहेल अंतर्गत मोफत आरोग्य शिबिरांची मालिका आयोजित करून स्थानिक समुदाया प्रतीची आपली बांधिलकी अधिक मजबूत केली आहे. एरंडोल येथील सनश्योरच्या 30 एम डब्ल्यू पी सौर प्रकल्पाजवळ ही शिबिरे आयोजित करण्यात आली असून प्राथमिक आरोग्य सेवा गावकऱ्यांपर्यंत सहज उपलब्ध करून देणे हा त्यामागचा उद्देश आहे. 7 डिसेंबर रोजी गांधीपुरा श्री द्वारकाधीश क्लिनिक जवळ, 13 डिसेंबर रोजी द्वारकाधीश भवन जवळ ( बडगुजर भवन जवळ गांधीपुरा) 14 डिसेंबर रोजी कम्युनिटी हॉल विखरण रोड एरंडोल येथे आयोजित केलेल्या तीन वैद्यकीय शिबिरांचा लाभ पाचशेहून अधिक रहिवाशांना झाला आहे. या शिबिरामध्ये सामान्य सल्लामसलत, प्रसतीपूर्वक काळजी, दंत आणि डोळ्यांची तपासणी व रक्तदाब आणि मधुमेह तपासणी यासारख्या सेवांचा समावेश आहे. हा कार्यक्रम आता त्याच्या पुढच्या टप्प्यात जात आहे. ज्यामध्ये आणखी शिबीर नियोजित आहेत. 30 डिसेंबर रोजी सूर्योदय ज्येष्ठ नागरिक बहुउद्देशीय संस्था, ज्येष्ठ नागरिक सभागृह दत्त कॉलनी एचडीएफसी बँकेजवळ आयोजित करण्यात आले आहे. सर्व शिबिरे सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत असून युनायटेड वे मुंबई व स्थानिक वैद्यकीय भागीदारांचेही यासाठी सहकार्य मिळते. या उपक्रमाबद्दल श्री मनीष मेहता सीसीओ, सह संस्थापक, एनर्जी सनसश्योर म्हणाले की, सन श्योर आपल्या प्रकल्पांच्या आसपासच्या समुदायावर मोठा विश्वास ठेवला आहे. आणि या समुदायांनीही आम्हांला त्यांच्यासोबत काम करण्याचा आणि प्रगती करण्याचा विश्वास दिला आहे. स्वास्थ पहल उपक्रमाद्वारे आम्ही या परस्पर विश्वासाचा सन्मान करत आहोत. जिथे त्यांची सर्वाधिक आवश्यकता आहे तिथे अर्थपूर्ण परिणाम घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे. या भागात पाच ठिकाणी शिबिरांचे आयोजन करून अधिकाधिक गरजू लोकांपर्यंत हे उपक्रम पोहोचवावे. आणि आरोग्य जागरूकता व काळजी याबाबत दीर्घकालीन सकारात्मक परिणाम भावा अशी आमची इच्छा आहे. स्वच्छ ऊर्जा निर्मिती आणि समुदायांसोबत आदर युक्त, दीर्घकालीन नातेसंबंध निर्माण करण्याच्या आपल्या मूल्यांना अनुसरून सनश्योर एनर्जी जबाबदार पद्धतीने भारताच्या प्रगतीमध्ये योगदान देत राहील.




