शेठ ला. ना. सा. विद्यालयात किशोर महोत्सवांतर्गत चित्रकला व सुंदर हस्ताक्षर स्पर्धा उत्साहात पार
(650 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग)

जळगाव : शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ ला. ना. सा. विद्यालयात विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी दरवर्षी आयोजित करण्यात येणारा किशोर महोत्सव यंदा उत्साहात पार पडला. “किशोर महोत्सव–2025” अंतर्गत चित्रकला व सुंदर हस्ताक्षर या दोन्ही स्पर्धांचे आयोजन नुकतेच करण्यात आले.

या स्पर्धा अ, ब, क अशा तीन गटांमध्ये घेण्यात आल्या. चित्रकला स्पर्धेत स्वच्छता अभियान, ऑपरेशन सिंदूर व भारतातील AI क्रांती या विषयांवर तब्बल 300 विद्यार्थ्यांनी आकर्षक व आशयपूर्ण चित्रे साकारली.
तर सुंदर हस्ताक्षर स्पर्धेत 350 विद्यार्थ्यांनी सहभाग घेत पाठ्यपुस्तकातील गद्य उतारे सुंदर अक्षरात लिहिले. विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर सुधारावे, योग्य विरामचिन्हे, शब्दांतील अंतर, अक्षरांचा आकार व उंची याबाबत मार्गदर्शन मिळावे, हा या स्पर्धेचा उद्देश होता.
स्पर्धांना शाळेचे मुख्याध्यापक श्री. सचिन देशपांडे, उपमुख्याध्यापक श्री. प्रशांत जगताप, ज्येष्ठ पर्यवेक्षक श्री. संजय वानखेडे, पर्यवेक्षिका सौ. रमा तारे, सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ. सुवर्णा वंजारी, उपप्रमुख सौ. स्मिता करे यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांचे तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या.
या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी चित्रकला शिक्षक श्री. प्रेमराज सारस्वत, सौ. नीलिमा सपकाळे, श्री. आनंद पाटील, श्री. गौरव देशमुख, श्री. जावेद पटेल तसेच हस्ताक्षर समिती प्रमुख श्री. नितीन कोष्टी, उपप्रमुख सौ. रेखा पाटील, श्री. योगेश सोनजे, सौ. संगीता कुलकर्णी, सौ. वृषाली पाटील, श्री. हीतेंद्र जोशी, श्रीमती जागृती मोराणकर आदी शिक्षक व सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि शाळेच्या सक्रिय आयोजनामुळे किशोर महोत्सव – 2025 अत्यंत यशस्वीरीत्या संपन्न झाला.


