लोकल न्यूज़
महात्मा फुले हायस्कूल येथे चित्रकला व रंगभरण स्पर्धा !


धरणगाव प्रतिनिधी :- रवींद्र निकम
धरणगाव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा – महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे २६ नोव्हेंबर – भारतीय संविधान दिन व २८ नोव्हेंबर – राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फुले स्मृतिदिन यानिमित्त चित्रकला व रंगभरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक जे एस पवार व शाळेतील कलाशिक्षक एच डी माळी यांच्या मार्गदर्शनाने शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांनी या दोन्ही स्पर्धांमध्ये उत्साहाने भाग घेतला. प्रत्येक वर्गासाठी वेगवेगळ्या चित्रकलेचा विषय देण्यात आला होता. या स्पर्धेतून प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ येणाऱ्या विद्यार्थ्यांना २६ नोव्हेंबरला बक्षीस देण्यात येणार आहे. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी कलाशिक्षक एच डी माळी, पी डी पाटील यासह शाळेतील सर्व शिक्षक बंधू-भगिनी व कर्मचारी वृंद यांनी सहकार्य केले.




