लोकल न्यूज़
बालकवी ठोंबरे व सारजाई कुडे विद्यालयात वाचन प्रेरणा दिवस साजरा

धरणगाव- येथील बालकवी ठोंबरे प्राथमिक शाळा व सारजाई दामोदर कुडे माध्यमिक विद्यालयात आज 15 ऑक्टोबर रोजी भारताचे माजी राष्ट्रपती डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांची जयंती निमित्त वाचन प्रेरणा दिवस साजरा करण्यात आला. श्री व्ही.बी पाटील सर, मुख्याध्यापक श्री एस एस पाटील सर यांनी भारतमातेच्या व डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले.तसेच शाळेतील विद्यार्थी व शिक्षक वृंद यांनीही पुस्तकांचे वाचन केले. याप्रसंगी शाळेचे ग्रंथपाल गोपाल माळी सर शाळेतील शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सांस्कृतिक समितीचे प्रमुख श्री वाय पी पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.




