पाळधी (ता. धरणगाव) येथे हिंदू जनजागृती समितीच्या वतीने शौर्य जागरण शस्त्र पूजन उत्सव संपन्न.



पाळधी (ता. धरणगाव) : विजयादशमी निमित्त हिंदू जनजागृती समितीच्या वतीने शौर्य जागरण शस्त्र पूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. समिती सेवकांनी पारंपरिक शस्त्रांचे शास्त्रोक्त पद्धतीने पूजन करून विधी संपन्न केला.या कार्यक्रमास माननीय श्री. प्रतापराव गुलाबराव पाटील, ह.भ.प. श्री ज्ञानेश्वर महाराज पाळधीकर, तसेच खर्ची येथील रहिवासी बीएसएफ जवान सोपान माळी यांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमात श्री. निखिल कदम (हिंदू जनजागृती समिती) यांनी शस्त्र पूजनाचे महत्त्व पटवून दिले. ते म्हणाले, “बळी हा दुबळ्याचा दिला जातो. शक्तीवान माणूसच स्वतःचे आणि धर्माचे रक्षण करू शकतो.”
यावेळी आपल्या मनोगतात ह.भ. प.श्री ज्ञानेश्वर महाराज पाळधीकर म्हणाले,
“शास्त्राचे रक्षण शस्त्र शिवाय होऊ शकत नाही. धर्मरक्षणासाठी शस्त्र ही केवळ परंपरा नसून ती आपल्या शौर्याची आणि आत्मसन्मानाची ओळख आहे.”
शौर्य जागरण शस्त्र पूजन प्रसंगी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक व गावातील प्रतिष्ठित व्यक्तींनीही सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. जितेंद्र चौधरी यांनी केले.
संपूर्ण यूट्यूब व्हिडिओ 👇https://youtu.be/bFTqMipkYzI?si=5dN5J1w9FR8XjveV




