लोकल न्यूज़

धरणगाव : मोठा माळी वाडा माळी समाज सुधारणा पंच मंडळाची नूतन कार्यकारिणी जाहीर

धरणगाव (प्रतिनिधी) : मोठा माळी वाडा येथील माळी समाज सुधारणा पंच मंडळ या प्रतिष्ठित संस्थेची नूतन कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली. समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आणि विविध सामाजिक उपक्रमांसाठी नेहमीच अग्रेसर असलेल्या या मंडळाकडून यावेळी देखील ताज्या कार्यकारिणीकडे अपेक्षेने पाहिले जात आहे.

या निवडीत —

  • अध्यक्षपदी- मा. व्ही. टी. माळी सर,
  • उपाध्यक्षपदी -श्री सोमनाथ एकनाथ महाजन,
  • सचिवपदी- श्री. आर. डी. पाटील सर

यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

निवडीनंतर परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून समाजातील मान्यवर, तरुण कार्यकर्ते तसेच ग्रामस्थांनी नव्या पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. सामाजिक ऐक्य, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी नूतन कार्यकारिणी कटिबद्ध राहील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!