धरणगावात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त स्वच्छता अभियान व झाडे लावा-झाडे जगवा पंढरवाडा

धरणगाव (प्रतिनिधी) :- रवींद्र निकम
पंतप्रधान सन्माननीय श्री नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात स्वच्छता अभियान व “झाडे लावा-झाडे जगवा पंधरवडा” या संकल्पनेतून विशेष उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात भाजपसह विविध पक्ष व सामाजिक संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाला भाजपचे जिल्हाध्यक्ष श्री संजय भाऊ महाजन, गटनेते कैलास माळी सर, शहराध्यक्ष दिलीप भाऊ महाजन, धरणगाव कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती जिजाबराव पाटील, भाजपचे ज्येष्ठ नेते श्री शिरीष आप्पा बयस, श्री कमलेश दादा तिवारी, श्री पुनिलाल आप्पा महाजन यांच्यासह भाजप नगरसेवक श्री चंदन दादा पाटील, श्री ललित येवले, ॲड. व्ही. एस. भोलाणे (बापू), ॲड. हर्षल चव्हाण, भैया भाऊ मराठे, पाटील समाज अध्यक्ष श्री भीमराज भाऊ पाटील, भाजप नेते श्री भाऊसाहेब पाटील उपस्थित होते.
तसेच शिवसेना गटनेते श्री पप्पू भाऊ भावे, नगरसेवक श्री विलास महाजन, श्री वाल्मीक भाऊ पाटील, श्री वासू भाऊ चौधरी, श्री बुटया पाटील, श्री पवन महाजन, श्री पवन पाटील, श्री बाळासाहेब जाधव, सोनू भाऊ महाजन, सद्दाम भाई व नगरपालिका कर्मचारी यांसह विविध मान्यवर व कार्यकर्ते सहभागी झाले.
या उपक्रमात शहरातील विविध भागात स्वच्छता करण्यात आली तसेच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत झाडांची लागवड करण्यात आली.



