राजनीतिलोकल न्यूज़

गिरणेचे वाहून जाणारे पाणी थेट पाटात सोडा.

राकाँशप पक्षाच्या वतीने सातत्याने पाठपुरावा.

धरणगाव – गिरणा धरण 100% भरले असून नदीत पाण्याचा अपव्यय होण्यापेक्षा ते पाणी पाटात सोडण्यात यावे यासाठी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने मागील 13 दिवसांपासून पाटबंधारे विभाग जळगाव यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा सुरु आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, दि 25 ऑगस्ट 2025 वार सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष धरणगाव च्या पाटबंधारे विभागाचे शिष्टमंडळाने अधीक्षक अभियंता संतोष भोसले तसेच कार्यकारी अभियंता (गिरणा) विनोद पाटील यांची भेट घेतली. यावेळी सांगितलं गेलं की विविध ठिकाणी पाटाची दुरुस्ती करून लवकरच पाणी सोडण्यात येईल. त्यानंतर पुन्हा 1 सप्टेंबर रोजी पुन्हा भेट घेतली तेव्हा पाणी सोडण्याच्या संदर्भातील काही तांत्रिक त्रुटी दूर करण्याचा विषय मार्गी लागला. त्यानंतर 5 सप्टेंबर रोजी पुन्हा भेट घेण्यासाठी आले असता कार्यालयीन सुट्टी असल्याने फोनवर संपर्क साधून पाठपुरावा केला. आज पुन्हा जळगाव येथे राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे पदाधिकारी पाटबंधारे विभागात आले असता अधिकारी गिरणा साईटवर गेले होते. अधीक्षक अभियंता भोसले साहेब यांचेशी फोनवर संपर्क साधून पाणी वाया जाण्यापेक्षा पाटात सोडले तर शेतकऱ्यांना लाभ मिळेल असे तळमळीने सांगितले. भोसले साहेबांनी कार्यकारी अभियंता विनोद पाटील यांना आदेशित करून पावसामुळे रखडलेल्या दुरुस्तीची कामे तातडीने करायला सांगितले तसेच उपविभागीय अभियंता तुषार राजपूत यांना संपर्क साधला असता त्यांनी खुलासा केला की उद्याच कामाला सुरवात करून लवकरच सर्व कागदोपत्री प्रकिया पूर्ण करून 12 सप्टेंबर पर्यंत पाटात पाणी सोडण्याचे आश्वासन दिले. जर 12 तारखेला पाणी सोडले नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने देण्यात आला.
या सर्व पाठपुरावा करण्याच्या प्रक्रियेत पक्षाच्या माजी युवती अध्यक्षा कल्पिता पाटील, महिला तालुकाध्यक्षा आशा पाटील, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील, प्रा एन डी पाटील, डॉ विलास चव्हाण, धरणगाव तालुकाध्यक्ष संजय पाटील, कार्याध्यक्ष हितेंद्र पाटील, माजी सरपंच उज्वल पाटील, जेष्ठ नेते सुभाष पाटील, राजेंद्र धनगर, नंदू धनगर, विनायक पाटील, ओंकार माळी, बापू मोरे, रमेश सपकाळे, उद्योजक एकनाथ पाटील, कॉन्ट्रॅक्टर मोहीत पवार, शहराध्यक्ष लक्ष्मणराव पाटील, व्यावसायिक नितीन पाटील, अमित शिंदे, खलील खान, भाईदास पाटील, गोपाल पाटील, भगवान शिंदे, युवक तालुकाध्यक्ष परेश गुजर, कार्याध्यक्ष साईनाथ पाटील, उपाध्यक्ष राहुल पाटील, योगेश पाटील, प्रमोद पाटील, युवा नेतृत्व वाल्मिक पाटील, जुनेद बागवान, साजिद कुरेशी, सागर महाले, प्रकाश लांबोळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!