इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूलमध्ये गणरायाला जल्लोषात निरोप

पाळधी | दि. 02 सप्टेंबर 2025 –इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूलमध्ये आज ढोल-ताशांच्या गजरात, डीजेच्या नादात आणि विद्यार्थ्यांच्या गजरात “गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या!” या घोषणांनी गणरायाला निरोप देण्यात आला. विद्यार्थ्यांच्या आनंदाश्रूंनी आणि उत्साहात निरोप सोहळा रंगला.
सालाबादाप्रमाणे याही वर्षी गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी गणेश आरतीनंतर विद्यार्थ्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धा, रॅम्प वॉक, भारतीय संस्कृतीवर निबंध स्पर्धा तसेच मातीपासून गणपती बनविण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
या प्रसंगी शाळेचे चेअरमन इंजी. नरेशजी चौधरी यांनी सहपत्नींसह गणरायाची आरती केली. कार्यकारी संचालक श्री. जी.डी. पाटील, प्राचार्य श्री. विवेक रुपनर, शिक्षक-शिक्षिका व विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
कार्यक्रमानंतर नर्सरी ते दहावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी तसेच संपूर्ण इम्पिरियल परिवारासाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. प्रसाद ग्रहण करून सर्वांनी आनंद व्यक्त केला.
शेवटी ढोल-ताशांचा दणदणाट, डीजेच्या गजरात आणि विद्यार्थ्यांच्या आनंदी घोषणा करत लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला.




