लोकल न्यूज़
खाटू शाम बाबा च्या आशीर्वादाने अज्ञात दांपत्याचे बदलले जीवन

पाळधी बु ता.धरणगाव येथील श्रीराम नगर जी.पी.एस. मित्र परिवार यांनी यंदा गणेशोत्सवाच्या निमित्ताने खाटू शाम बाबा यांचा देखावा साकारला आहे. या देखाव्यासाठी परिसरातील हजारो भाविक दर्शनासाठी गर्दी करत आहेत.
विशेष म्हणजे, पाळधी नगरीत प्रथमच खाटू शाम बाबा यांचा देखावा साकारला गेल्याने श्रद्धाळूंमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. या भाविकतेला प्रतिसाद देत एका अज्ञात दांपत्याने गुप्त दान स्वरूपात तब्बल ₹५१,०००/- (एकावन्न हजार रुपये) देणगी अर्पण केली.
या उदात्त कार्यामुळे जी.पी.एस. मित्र परिवारात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी त्या अज्ञात दांपत्याचे मनःपूर्वक स्वागत करून त्यांचे आभार मानले आहेत.
“जय हो खाटू शाम बाबा!” अशा घोषणांनी संपूर्ण गणेशोत्सव परिसर भक्तिरसात रंगून गेला आहे.




