लोकल न्यूज़

कुंदकेश्वर महादेव मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा पालकमंत्री यांच्या शुभहस्ते संपन्न.

धरणगाव (प्रतिनिधी) – रवींद्र निकम

धरणगाव शहरातील लहान माळीवाडा परिसरात नव्याने उभारण्यात आलेल्या कुंदकेश्वर महादेव मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या शुभहस्ते उत्साहात संपन्न झाला.

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख पी. एम. पाटील, राष्ट्रीय चर्मकार समाजाचे नेते भानुदास आप्पा विसावे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रामविलास झवर, नगरपरिषदेचे गटनेते विनय (पप्पू) भावे, शिवसेना शहर प्रमुख विलास महाजन, उपतालुकाप्रमुख संजय चौधरी, पालकमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक अभिजीत पाटील यांच्यासह नवल पाटील, वाल्मीक पाटील, बुट्या पाटील, पवन महाजन, पप्पू कंखरे, रामकृष्ण महाजन, रुपेश सोनार, कल्पेश विसावे, प्रशांत देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.

सोहळ्याला कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच परिसरातील भाविकांचा मोठा सहभाग लाभला. मंदिर परिसरात दिवसभर धार्मिक वातावरण लाभले असून, भाविकांच्या उपस्थितीने प्राणप्रतिष्ठा सोहळा यशस्वीरीत्या पार पडला.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!