लोकल न्यूज़

स्मशानभूमीत घाणीचे साम्राज्य; शहरवासीयांचा संताप.

धरणगाव प्रतिनिधी- रवींद्र निकम

धरणगाव शहरातील धरणगाव नगरपरिषदेच्या अखत्यारीत असलेल्या चार स्मशानभूमींपैकी सोनवद रोड व कृषी उत्पन्न बाजार समिती जवळील स्मशानभूमीमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून घाणीचे साम्राज्य पसरले असून नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे.

सोनवद रोड स्मशानभूमीसाठी तब्बल ९० लाखांचा तर कृषी उत्पन्न बाजार समितीजवळील स्मशानभूमीसाठी एक कोटीपेक्षा अधिक निधी सुवर्ण जयंती योजनेअंतर्गत खर्च करण्यात आला आहे. या दोन्ही ठिकाणी शहरासह आसपासच्या गावांतील नागरिक मोठ्या संख्येने अंत्यसंस्कारासाठी येतात. सर्व जाती-धर्मातील लोक या स्मशानभूमींचा वापर करतात. मात्र, कोट्यवधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या स्मशानभूमीत आज गटारगंगा व कचऱ्याचे साम्राज्य दिसून येत असल्याने नागरिकांच्या भावना दुखावल्या जात आहेत.

सध्या स्मशानभूमी परिसरात पावसामुळे उगवलेले गवत, प्रेतावरील कपड्यांचे ढिग, कचरा आणि दुर्गंधीमुळे अस्वच्छ वातावरण निर्माण झाले आहे. रात्रीच्या वेळी अंत्यसंस्काराला आलेल्या नागरिकांना सर्प व विंचवाच्या भीतीने प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.

पालिका प्रशासनाकडून येथे नियमित साफसफाई, गवत निर्मूलन व तणनाशक फवारणी करण्याची मागणी शहरवासीयांकडून होत आहे. अन्यथा जनतेचा संताप वाढत जाईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!