धरणगाव येथे संत शिरोमणी सेनाजी महाराज पुण्यतिथी साजरी

धरणगाव (प्रतिनिधी) : रवींद्र निकम
धरणगाव येथे सकल नाभिक समाजाच्या वतीने संत शिरोमणी सेनाजी महाराज यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमात बोरसे, फुलपगार, निकम, झुंजारराव, इंगळे, गायकवाड, वारुडे, सोनवणे परिवार यांच्या उपस्थितीत संत सेनाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन श्री. महारू बोरसे, सौ. निर्मला बोरसे, विजय बोरसे व सौ. गायत्री बोरसे यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाला शिवसेना उपनेते गुलाबराव वाघ, जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील, लोकनियुक्त नगराध्यक्ष नीलेश चौधरी, कैलास माळी सर, नगरसेवक वासुदेव चौधरी, विजय महाजन, भागवत चौधरी, ज्येष्ठ पत्रकार भरत चौधरी, चर्मकार समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष भानुदास विसावे, पत्रकार विनोद रोकडे आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी सेनाजी महाराजांना अभिवादन केले.
यावेळी श्री. महारू नागो बोरसे (बांभोरीकर) यांच्या पुढाकारातून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.
या प्रसंगी कमलेश बोरसे, गोपाल फुलपगार, सतीश बोरसे, राजेंद्र अण्णा फुलपगार, अनंत फुलपगार, प्रशांत फुलपगार, रवींद्र निकम, दिगंबर निकम, आबा फुलपगार, मनोज निकम, हेमंत फुलपगार, अशोक झुंजारराव, गणेश झुंजारराव, न्यानेश्वर झुंजारराव, दीपक झुंजारराव, संजय झुंजारराव, बापू झुंजारराव, महेश निकम, प्रभाकर बोरसे, मोहन फुलपगार, विनोद झुंजारराव, दिनेश बोरसे, बापूजी फुलपगार, सुभाष बोरसे, गणेश निकम, भूषण वारुळे, आबा झुंजारराव, राजेंद्र फुलपगार, रवींद्र फुलपगार, राजेंद्र बोरसे, गजानन फुलपगार, सुपडू झुंजारराव आदींचा उत्साहपूर्ण सहभाग होता.




