लोकल न्यूज़

तरडे खुर्द येथे श्री संत तानसेन महाराज मंदिर जीर्णोद्धार सोहळा व वारकरी दर्शन कार्यक्रम संपन्न.

 

तरडे खुर्द (ता. धरणगाव) येथे श्री संत तानसेन महाराज मंदिर जीर्णोद्धार सोहळा, वारकरी दर्शन सोहळा तसेच एकदिवसीय कीर्तन महोत्सव व भंडारा महाप्रसादाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.

या सोहळ्यास गावातील तसेच पंचक्रोशीतील सर्व भजनी मंडळींनी हजेरी लावली. कार्यक्रमात आजचे कीर्तनकार पिठाधिपती श्री हरिभक्त परायण गोविंद महाराज चौधरी (पाचोरा) यांच्या कीर्तनाचा विशेष आनंद भाविकांनी लुटला.

कार्यक्रमाला श्री श्री 1008 महामंडलेश्वर श्री हरिभक्त परायण महंत भगवानदासजी महाराज (अध्यक्ष, माऊली वारकरी शिक्षण संस्था, धरणगाव), श्री ह.भ.प. हिरालाल महाराज, श्री ह.भ.प. अतुल महाराज नारनेकर, श्री हरिभक्त परायण गजानन महाराज वरसाडेकर, श्री ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज पाळधीकर, श्री ह.भ.प. गोपाल महाराज दोनगावकर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गुलाबरावजी पाटील यांचे चिरंजीव व जिल्हा परिषद सदस्य प्रताप भाऊ पाटील, आबासो पीसी पाटील साहेब तसेच परिसरातील ग्रामस्थ व वारकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहिले.

कार्यक्रमाची सांगता भंडारा महाप्रसादाने झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!