लोकल न्यूज़
धरणगाव मरीआई मंदिरात विधीव्रत पूजन; विविध समाजांचे पंच मंडळ व नागरिकांची उत्स्फूर्त उपस्थिती
नागरिकांची उत्स्फूर्त उपस्थिती


प्रतिनिधी- रवींद्र निकम
धरणगाव– समस्त माळी व कुणबी पाटील समाज पंच मंडळाच्या वतीने धरणगाव येथील ग्रामदैवत मरीआई मंदिरात विधीव्रत पूजन मोठ्या भक्तिभावाने पार पडले. या धार्मिक विधीत माळी, कुणबी पाटील, तिळवण तेली, मराठे समाजासह इतर विविध समाजांचे पंच मंडळ व समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या पूजनाच्या माध्यमातून समाज एकतेचा सुंदर संदेश देण्यात आला. ग्रामदैवतावरील श्रद्धा आणि परंपरांचे जतन करण्याचा हेतू यामागे असून, या कार्यक्रमामुळे ग्रामस्थांमध्ये अध्यात्मिक ऊर्जा व एकात्मतेची भावना अधिक बळावली.
कार्यक्रमानंतर उपस्थित सर्व मान्यवरांचे व नागरिकांचे आभार पंच मंडळाच्या वतीने व्यक्त करण्यात आले.




