पाळधी | प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यात आज पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ पाळधी येथे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते उत्साहात करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती करिष्मा नायर प्रमुख उपस्थित होत्या.
कार्यक्रमास जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय चव्हाण, वैद्यकीय अधिकारी डॉ. ऋषिकेश झवर, डॉ. सायमा खान, लोकनियुक्त सरपंच बापूसाहेब विजय पाटील, माजी पंचायत समिती सभापती मुकुंद नन्नवरे, ग्रामविकास अधिकारी दीपक पाठक, आरोग्य सहाय्यक अनिल महाजन, हितेश पाटील, आरोग्य सेवक अतुल नन्नवरे, प्रदीप अडकमोल, गटप्रवर्तक संगीता पाटील तसेच सर्व आशा सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
यावेळी मान्यवरांनी पालकांना आपल्या पाच वर्षांखालील प्रत्येक बालकाला पल्स पोलिओचे दोन थेंब पाजून या राष्ट्रीय मोहिमेत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. बालकांना पोलिओमुक्त आणि निरोगी भवितव्य देण्यासाठी ही मोहीम अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.
Back to top button
error: Content is protected !!