महाराष्ट्र
Trending

VES राज्यस्तरीय कौशल्य परीक्षेत इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल चे उत्तुंग यश.

प्रतिनिधी/पाळधी

इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल पाळधी येथे राबविण्यात आलेल्या महाराष्ट्र शासन मान्यता दिलेल्या आणि Versatile Educare System या संस्थेमार्फत राबविण्यात आलेल्या ब्रेन डेव्हलपमेंट प्रोग्राम अंतर्गत इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूलच्या एकूण 42 विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले असून दि 01 मार्च रोजी कारंजा जिल्हा वाशीम येथे राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या परीक्षेस राज्यातून दहा हजार पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला होता. त्यात आर्थिक

साक्षरता, अबॅकस, वेदिक मॅथ्स, इंग्लिश / मराठी हस्ताक्षर सुधारणा, रुबीक क्यूब या विषयांचा समावेश आहे. 

या अभ्यासक्रमाअंतर्गत घेतलेल्या परीक्षेत इंपिरियल इंटरनॅशनल स्कूल च्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुण मिळवून शाळेचे नाव उज्ज्वल केले. सर्वच अभ्यासक्रम उत्कृष्ट राबवल्याबद्दल शाळेला 3 राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर 1.हर्षवर्धन योगेश पाटील- अबॅकस , (राज्यस्तरीय पारितोषिक) 2.रितेश योगेश पाटील- अबॅकस, राज्यस्तरीय पारितोषिक, 3.युक्ती विकास पाटील- वेदिक मॅथ (राज्यस्तरीय पारितोषिक) या विद्यार्थ्यांनी पारितोषिक मिळवून शाळेचा मान उंचावला आहे. शाळेच्या शिक्षकांनी, विद्यार्थ्यांना संकल्पनात्मक समज, नियमित सराव व वैयक्तिक मार्गदर्शन यावर भर दिला. या यशात मोलाचा वाटा शाळेचे चेअरमन इंजि. श्री. नरेश चौधरी यांचा आहे. त्यांनी केलेले वेळोवेळी मार्गदर्शन आज विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासात दिसून आले. व पुढील वाटचालीसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!