खेलदेश
Trending

टी-२० विश्वचषक फायनल: १०,००० कोटींच्या सट्टेबाजी प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करा !

सुराज्य अभियानाचे नागपूर व गोवा येथील तक्रारींना समर्थन

नागपूर/पणजी आज अहमदाबाद येथे भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणार्‍या टी२० विश्वचषक २०२६ अंतिम सामन्याच्या पार्श्वभूमीवर देशात चालू असलेल्या १०,००० कोटी रुपयांच्या अवैध सट्टेबाजी रॅकेटचा उलगडा होत आहेहायटेक ॲप्स व ऑफशोअर सर्व्हरद्वारे हा घोटाळा चालवला जात असूनरायबंदरपणजी येथील जागरूक नागरिक श्रीदिलीप शेट्ये यांनी पणजी पोलीस आयुक्त व पोलीस महासंचालक यांच्याकडे लेखी तक्रार दिली आहेनागपूर येथे एका जागरूक नागरिकाने इमेलद्वारे तक्रार नोंदवली असूनया तक्रारींना हिंदू जनजागृती समितीने जाहीर पाठिंबा दिला आहेया प्रकरणाची विशेष तपास पथक (SIT)मार्फत उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी समितीने केली आहे.

गोवा सायबर शाखेकडे तक्रार देतांना उजवीकडे श्री. दिलीप शेट्ये

         काही प्रमुख वृत्तपत्रांत या सट्टेबाजीविषयी वृत्त प्रसिद्ध झाले आहेखरे तर याची सुमोटो दखल घेऊन पोलीस प्रशासनाने तत्परतेने कारवाई करायला हवी होतीसुराज्य अभियानाने म्हटले आहे कीइतक्या मोठ्या प्रमाणावर चालणारी अवैध सट्टेबाजी भारताच्या जागतिक प्रतिमेला तडा देणारी आहेयामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची नाचक्की होत असून भारतीय क्रिकेटची विश्वासार्हता धोक्यात आली आहेखरे तर क्रिकेटच्या निमित्ताने सट्टाजुगार मोठ्या प्रमाणावर चालतोहे चालवणारे काही ठराविक लोक असतातहे तपासयंत्रणांना माहिती असतेअनेक सट्टेबाजांना पकडल्याच्या बातम्या तर येतातमात्र पुन्हा सट्टाबाजार बिनबोभाट कोणाच्या आशीर्वादाने चालू रहातोहे शोधण्याचीतसेच छोट्या माश्याऐवजी मोठा मासा पकडण्याची नितांत गरज आहे.

        या संदर्भात सुराज्य अभियानाने मागणी केली आहे की१०,००० कोटींच्या या आकड्याची भीषणता लक्षात घेतापोलिसांनी तात्काळ संबंधित प्रसारमाध्यमांशी संपर्क साधून या माहितीच्या स्रोताची तपासणी करावी आणि सट्टेबाजांचे नियंत्रण कक्ष उद्ध्वस्त करावेतजप्त रक्कम जनहिताच्या योजनांसाठी वापरावीकेंद्र सरकारने संमत केलेल्या ऑनलाइन गेमिंग कायदा २०२५नुसार ही कारवाई करावीज्यात अवैध सट्टेबाजीला मदत अजामीनपात्र गुन्हा आहेअंमलबजावणी संचालनालय (ED) व सायबर सेलने हवाला मार्ग व डिजिटल पेमेंट गेटवेज बंद करावेतस्थानिक बुकी आणि आंतरराष्ट्रीय सिंडिकेट यांच्यातील संबंधांचा शोध घेण्यासाठी राज्य स्तरावर तात्काळ विशेष तपास पथक‘ स्थापन करावे.

      आपल्या देशाची आणि क्रिकेटची जगभरात बदनामी होऊ नयेयासाठी सामना संपण्यापूर्वीच या रॅकेटवर देशांतर्गत सर्जिकल स्ट्राईक होणे गरजेचे आहेअसे सुराज्य अभियानाने म्हटले आहेप्रशासकीय पारदर्शकता आणि राष्ट्रीय हितासाठी सुराज्य अभियान या प्रकरणाचा पाठपुरावा करत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!