
खर्ची: कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, सामाजिक शास्त्रे प्रशाळा, समाजकार्य विभाग, माध्यमिक विद्यालय व महिला मंडळ खर्ची यांच्या माध्यमातून समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त तसेच जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ‘जागर नारीशक्तीचा’ हा प्रेरणादायी कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. समाजकार्य विभाग दरवर्षी महिला सप्ताह मोठया उत्साहात साजरा करीत असतो. यावर्षी देखील विविध विद्यार्थीहिताचे कार्यक्रम विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आले होते. त्यात मैदानी क्रीडा स्पर्धा व पोस्टर प्रदर्शन तसेच खर्ची येथे उदबोधन पर कार्यक्रम आयोजित करण्यात आला याप्रसंगी.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावाच्या सरपंच सौ.आशाताई महाजन या होत्या, तर प्रमुख अतिथी म्हणून मा श्री नानाभाऊ महाजन (मा जि प सदस्य) यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या म्हणून सुचित्रा महाजन मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सावित्रीबाई फुले व कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर समाजकार्यच्या विद्यार्थ्यांनी यज्ञासेनी चौधरी व वैशाली कोळी यांनी स्वागत गीत सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापिका वर्षा पालखे यांनी केले. प्रमुख वक्त्या सुचित्रा महाजन मॅडम यांनी आपल्या प्रभावी भाषणातून सावित्रीबाई फुले यांनी स्त्रीशिक्षणासाठी केलेल्या संघर्षमय कार्याचा आढावा घेत महिलांच्या सशक्तीकरणासाठी शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. व उपस्थित विद्यार्थ्यांना यावेळी स्वप्न बघा कारण बघितलेलं स्वप्न सत्यात उतरते आणि ध्येय साध्य करायला मदत होते. महिलांनी शिक्षण, सामाजिक कार्य, प्रशासन व विविध क्षेत्रांत केलेली उल्लेखनीय प्रगती विद्यार्थ्यांसमोर मांडून त्यांनी विद्यार्थिनींना आत्मविश्वासाने पुढे जाण्याचे आवाहन केले. प्रमुख अतिथी श्री नानाभाऊ महाजन यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत शिक्षणातूनच समाजाचा सर्वांगीण विकास साधता येतो, असे प्रतिपादन केले. यावेळी सीमाताई माळी, अल्काताई माळी, विद्यालयाच्या उपशिक्षिका लोखंडे मॅडम यांनी मनोगत व्यक्त केले. सरपंच आशाताई माळी यांनी अध्यक्षीय समारोप केला.
या कार्यक्रमात समाजकार्याचे विद्यार्थी :- यज्ञासेनी चौधरी, वैशाली कोळी, धनश्री शिरसाठ, कोमल शिरसाठ, गजानन बोरसे, अजय निकम,आनंद जैस्वाल, राहुल बागुल, गौरव वाकोडे यांनी नारी शक्तीवर आधारित पथनाट्य सादर केले. तसेच समाजकार्यच्या विद्यार्थ्यांनी पोस्टर सादरीकरण केले. तसेच कार्यक्रमाच्या सुरुवातीला सकाळी गावात रॅली काढून गावात नारी शक्ती याविषयावर घोषणा व स्लोगन च्या माध्यमातून जनजागृती केली.
कार्यक्रमामुळे स्त्रीशक्तीबद्दल जागरूकता निर्माण होऊन विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली यावेळी व्यासपीठावर उत्तम महाजन,महिला मंडळाचे पदाधिकारी, सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यापीठाचे समाजकार्य विभागाचे प्राध्यापक प्रा. योगेश माळी सर. प्रा. विनेश पावरा सर, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. अनिल माळी सर तसेच सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी तसेच महिला मंडळाच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन. प्रा. योगेश माळी यांनी केले. तर प्रा. विनेश पावरा यांनी आभार मानले कार्यक्रमास दगडू महाजन, विठ्ठल महाजन, भुरा महाजन, रामचंद्र महाजन, नवल माळी, श्री. प्रशांत सूर्यवंशी गांधी रिसर्च फॉउंडेशन, ऍडव्होकेट रोहन महाजन, गावातील महिला, युवती, विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




