महाराष्ट्र

७ मार्चला जळगावात ‘नारी सामर्थ्याची नवी पहाट’ कार्यक्रमाचे आयोजन.

मेजर मैत्रेयी दांडेकर आणि 'आयर्न मॅन ' माहेश्वरी सरनौबत यांची प्रमुख उपस्थिती.

जळगाव: हिंदू जनजागृती समिती प्रणीत ‘रणरागिणी’ शाखेतर्फे जळगाव शहरात ‘नारी सामर्थ्याची नवी पहाट’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महिलांनी स्वसंरक्षण आणि आपल्या संस्कृतीप्रती जागृत व्हावे, या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमाला जळगावमधील जास्तीत जास्त रणरागिणींनी उपस्थित राहावे, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून भारतीय सैन्यात देशसेवा बजावलेल्या मेजर मैत्रेयी दांडेकर आणि ‘आयर्नमॅन’ माहेश्वरी सरनोबत उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या अनुभवातून जळगावातील महिलांना नक्कीच नवी प्रेरणा मिळेल.

 

ही आहेत कार्यक्रमाची मुख्य आकर्षणे !

  • – कार्यक्रमात महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध विषयांवर मार्गदर्शन !
  • – स्वसंरक्षण प्रात्यक्षिके: महिलांना स्वतःचे रक्षण करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या स्वसंरक्षण कलेचे प्रत्यक्ष दर्शन !
  • – शौर्य व संस्कृती प्रदर्शन: भारतीय शौर्य गाथा आणि संस्कृतीचा वारसा दर्शवणारे भव्य प्रदर्शन !

जळगावच्या महापौर सौ. दीपमाला काळे यांना निमंत्रण !

रणरागिणींच्या वतीने कार्यक्रमाचे अनेक मान्यवर रणरागिणीना निमंत्रण देण्यात येत आहे. त्यातच जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांनाही निमंत्रण देण्यात आले. 

 सदर कार्यक्रम शनिवार, दिनांक ७ मार्च २०२६ या दिवशी सायंकाळी ५.३० वाजता आयोजित करण्यात आलेला असून गणेश कॉलनीमधील लुंकड कन्या शाळेच्या बाकरे सभागृहात हा कार्यक्रम होईल. 

महिलांनी आपल्या संस्कृतीची आणि सामर्थ्याची ओळख करून घेण्यासाठी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी ९५५२४२६४३९ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन रणरागिणीच्या वतीने कु. सायली पाटील हिने केले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!