महाराष्ट्र

दारव्हा येथे भव्य मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

दारव्हा : “वसा जनसेवेचा…! ध्यास आरोग्याचा…!!” या संदेशाला साजेसा स्तुत्य सामाजिक उपक्रम आज दारव्हा येथील मुंगसाजी महाराज महाविद्यालयाच्या प्रांगणात पार पडला. स्व. अजितदादा पवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ माजी आमदार सहकार महर्षी स्व. बाळासाहेब घुईखेडकर फाउंडेशन, यवतमाळ आणि विद्या प्रसारक मंडळ, दारव्हा यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोफत आरोग्य तपासणी, नेत्र तपासणी, रक्तदान व औषध वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या शिबिराचे उद्घाटन यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजयभाऊ देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमास माजी मंत्री शिवाजीराव मोघे, नाझीर काझी, जीवनभाऊ पाटील, प्रवीणभाऊ देशमुख, सुनीलभाऊ चिरडे, नानाभाऊ गाडबैले, मिलिंद रामटेके, दीपकराव कोप्पे, विनोद टोणे आणि बाबासाहेब पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यांनी या उपक्रमाचे कौतुक करत समाजोपयोगी कार्याचे महत्त्व अधोरेखित केले.

या शिबिरात आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी; महात्मा नेत्र रुग्णालय, नागपूर आणि वसंतराव नाईक शासकीय रुग्णालय, यवतमाळ येथील तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने हजारो रुग्णांची मोफत तपासणी करून आवश्यक औषधोपचार उपलब्ध करून दिले. तसेच रक्तदान शिबिरालाही नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

गरजू रुग्णांना मोठा दिलासा देणाऱ्या या शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल स्व. बाळासाहेब घुईखेडकर फाउंडेशनचे अध्यक्ष विराज वसंतराव घुईखेडकर तसेच विद्या प्रसारक मंडळाचे सर्व प्राचार्य, प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांचे उपस्थितांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!