जळगाव येथे सभेनिमित्त हिंदुत्वनिष्ठांची बैठक संपन्न !
१ फेब्रुवारीची हिंदु राष्ट्र जागृती सभा भव्य करणार ! - हिंदुत्वनिष्ठांचा निर्धार
जळगाव (वार्ता )- हिंदु जनजागृती समिती आणि विविध हिंदुत्ववादी संघटनाच्या वतीने आयोजित ” विराट हिंदु राष्ट्र जागृती सभा, रविवार दि. १ फेब्रुवारी रोजी, मानराज पार्क जवळील श्रीराम मंदिर संस्थानाच्या मैदानात आयोजित करण्यात आली आहे.
यानिमित्ताने शहरातील पद्मावती मंगल कार्यालयात शहरातील विविध हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष ह.भ.प जळकेकर महाराज, ह.भ.प. विक्रम महाराज, ह.भ.प. वरसाडेकर महाराज आणि सनातन संस्थेचे धर्मप्रसारक संत सद्गुरु श्री नंदकुमार जाधव हे व्यासपिठावर उपस्थित होते.


या वेळी सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी सांगितले की प्रभू रामचंद्र यांच्या भूमीवर विराट हिंदुराष्ट्र सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेमुळे शहरातील आणि जिल्ह्यातील वातावरण धर्ममय आणि उत्साहमय होते. यासाठी सर्व हिंदू धर्म प्रेमींनी या सभेच्या कार्यात सहभागी होऊन धर्माची सेवा करावी असे आवाहन त्यांनी या वेळी केले.
त्यानंतर ह.भ.प. जळकेकर महाराज यांनी सांगितले की हिंदू धर्मातील लोकांसाठी हा उपक्रम स्तुत्य असून अभूतपूर्व असा प्रतिसाद याला मिळत असतो या सभेच्या वेळी लावण्यात आलेल्या विविध प्रदर्शनी, तसेच काढण्यात आलेली वाहन फेरी यातून शहरात मंगलमय वातावरण निर्माण होते. यासाठी सर्व हिंदूंनी तन मन धन यांचा त्याग करून यात सहभागी झाले पाहिजे.
ह भ प वडसाडेकर महाराज यांनी या वेळी सांगितले की, वर्षातून एकदा होणाऱ्या या सभेत सर्व हिंदूंनी सहभागी झाले पाहिजे. ह.भ.प. विक्रम महाराजांनी सांगितले की शहरासोबत ग्रामीण भागातील सर्व हिंदूंनी या सभेत उपस्थित राहून आपले धर्मकार्तव्य बजावले पाहिजे.
या वेळी, नवनिर्वाचित नगरसेवक डॉक्टर वीरेंद्र खडके, विविध हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी, आणि कार्यकर्ते हे उपस्थित होते. बैठकीचे संचलन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री. गजानन तांबट यांनी केले.
30 जानेवारी रोजी वाहन फेरी !
सभेचा प्रसार होण्यासाठी शुक्रवारी 30 जानेवारी दुपारी 4 ते 6 या वेळेत वाहन फेरीचे आयोजन केले आहे. सभेच्या मैदानापासून फेरीला सुरुवात होऊन पिंप्राळा, खोटे नगर, भोईटे नगर, प्रेम नगर या भागातून फेरी जाणार आहे. यात अधिकाधिक धर्म बांधवांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन श्री. तांबट यांनी या वेळी केले.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
जळगाव मध्ये १ फेब्रुवारीला होणाऱ्या हिंदू सभेचे वैशिष्ट्य काय ?
हिंदूंची सभा घेण्याची आवश्यकता काय ? याविषयी अवश्य जाणून घ्या…




