धर्ममहाराष्ट्र
Trending

ह.भ.प. विक्रम महाराज सोनवणे यांची ‘आंतरराष्ट्रीय संत परिषद’ महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी निवड.

पाळधी (प्रतिनिधी):

धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील रहिवासी आणि अध्यात्मिक क्षेत्रातील परिचित व्यक्तिमत्व ह.भ.प. विक्रम आसाराम सोनावणे (महाराज) यांची ‘आंतरराष्ट्रीय संत परिषद’ च्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीमुळे जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

​अखिल आर्यावर्त संघ, आंतरराष्ट्रीय बजरंग दल महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने ही घोषणा करण्यात आली. संघटनेचे आंतरराष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष श्री. दिनेश (दादा) पाटील यांनी नियुक्तीचे अधिकृत पत्र देऊन या निवडीवर शिक्कामोर्तब केले आहे.

​निष्ठा आणि कार्याची दखल

​ह.भ.प. विक्रम महाराज यांची संघटनेप्रती असलेली निष्ठा, हिंदुत्वाचे विचार आणि आजवरचे सामाजिक व अध्यात्मिक क्षेत्रातील योगदान लक्षात घेऊन ही महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे. राष्ट्र आणि धर्म कार्यासाठी समर्पित राहून संघटना अधिक बळकट करण्यात त्यांचा मोलाचा वाटा असेल, असा विश्वास संघटनेच्या वतीने व्यक्त करण्यात आला.

​जळगाव जिल्ह्याचा सन्मान

​धरणगाव तालुक्यातील पाळधी सारख्या ग्रामीण भागातील एका समर्पित कार्यकर्त्याला राज्य स्तरावर एवढे मोठे पद मिळाल्याने, स्थानिकांनी त्यांचे भरभरून कौतुक केले आहे. “राष्ट्राच्या आणि धर्माच्या सेवेसाठी दिलेली ही जबाबदारी मी पूर्ण निष्ठेने पार पाडेल,” असा संकल्प ह.भ.प. विक्रम महाराज यांनी यावेळी व्यक्त केला.

​या नियुक्तीबद्दल त्यांचे राजकीय, सामाजिक आणि वारकरी संप्रदायातील मान्यवरांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!