एरंडोल येथील रा. ति. काबरे विद्यालयात स्नेह संमेलनाने नवीन वर्षाची उत्साही सुरुवात.

विशेष प्रतिनिधी -तुषार शिंपी. एरंडोल
एरंडोल, जळगाव, ३ जानेवारी २०२६ जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील प्रसिद्ध रा. ति. काबरे विद्यालयात आज नवीन वर्ष २०२६ ची सुरुवात अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात स्नेह संमेलन कार्यक्रमाने झाली. शाळेतील विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी एकत्र येऊन नवीन वर्षाचे स्वागत केले.
01 जानेवारी 2026 रोजी सकाळी मैदानी खेळाचे उद्घाटन शाळेचे मुख्याध्यापक श्री एस. एस.राठी सर यांच्या हस्ते झाले. दुपार सत्रात सर्व मान्यवरांचे ढोल पथक व लेझीम पथकाच्या गजरात मोठ्या उत्साहाने जल्लोसात स्वागत झाले. कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर म्हणून एरंडोल नगरीचे लोक नियुक्त नगराध्यक्ष डॉक्टर श्री नरेंद्रजी ठाकूर, गटशिक्षणाधिकारी श्री. आर. डी. महाजन साहेब उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री. काकाजी शरदचंद्रजी काबरे, उपाध्यक्ष एडवोकेट श्री. महेशजी काबरे, सचिव श्री. राजूभाऊ मणियार, सहसचिव श्री. धीरज काबरे सर , रा.ती. काबरे विद्यालयचे शालेय समिती चेअरमन श्री. अनिलजी बिर्ला, रा.ही. जाजू विद्या मंदिराचे शालेय समिती चेअरमन श्री. जगदीश जी बिरला, इंग्लिश मीडियम स्कूलचे शालेय समिती चेअरमन डॉक्टर श्री. नितीनजी राठी, स. न. झंवर विद्यालय पाळधीचे शालेय समिती चेअरमन श्री. सुनीलजी झंवर, संस्थेचे कार्यकारणी सदस्य श्री. परेशजी बिर्ला, श्री. सतीशभाऊ परदेशी, श्री. यशभाऊ मणियार, सौ. कल्पना झंवर मॅडम, समाजसेवक श्री. शालिकभाऊ गायकवाड,जावेदभाऊ मुजावर, नगरसेवक नितेशभाऊ चौधरी, पालक संघाचे सदस्य श्री.भूषणभाऊ पाटील, श्री. अरुणभाऊ पाटील , मुख्याध्यापक श्री एस. एस. राठी सर, उपमुख्याध्यापक श्री. पी. एच. नेटके सर, पर्यवेक्षक श्री. पी. एस. नारखेडे सर, रा.ही. जाजू विद्या मंदिराचे मुख्याध्यापिका सौ. जयश्री कुळकर्णी मॅडम उपस्थित होते.
दुपार सत्रात विद्यार्थिनींनी प्रार्थना व स्वागत गीत सादर केले. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्री सरस्वती पूजन करून तसेच दीप प्रज्वलन करून झाले. प्रमुख अतिथी नगराध्यक्ष डॉक्टर श्री. नरेंद्रजी ठाकूर तसेच गटशिक्षणाधिकारी श्री. आर. डी. महाजन यांचे स्वागत व सत्कार संस्थेचे अध्यक्ष काकाजी श्री शरदचंद्रजी काबरे यांच्या हस्ते झाले. सत्कार समारंभा नंतर प्रास्ताविक भाषण मुख्याध्यापक श्री एस. एस. राठी सर यांनी केले तसेच आभार प्रदर्शन विज्ञान शिक्षक श्री ए.एस. वाणी सर यांनी केले. कार्यक्रमाचे प्रमुख सूत्रसंचालन ज्युनिअर कॉलेजचे प्राध्यापक श्री संदीप महाजन सर व विद्यालयाचे उपशिक्षक श्री ए.एस. वाणी सर यांनी केले
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी शाळेच्या प्रांगणात मैदानी खेळांनी झाले.1 व 2 जानेवारी,2026 रोजी सांस्कृतिक कार्यक्रमात रा. हि. जाजू विद्या मंदिराचे इयत्ता पहिली ते चौथीचे विद्यार्थी तसेच रा. ति. काबरे विद्यालयाचे इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत, अंधश्रद्धापर लोकनाटिका, विविध नृत्य, नवीन वर्षाच्या शुभेच्छांवर आधारित कार्यक्रमाचे सादरीकरण केले. मुख्याध्यापकांनी उपस्थितांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आणि विद्यार्थ्यांना यशस्वी शैक्षणिक वर्षासाठी प्रेरणा दिली.
शाळेच्या शिक्षकांनीही विद्यार्थ्यांसोबत खेळ आणि स्नेहभोजनाची व्यवस्था केली होती, ज्यामुळे शिक्षक-विद्यार्थी यांच्यातील बंध अधिक दृढ झाले. पालकांनीही या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला आणि शाळेच्या या उपक्रमाचे कौतुक केले.
रा. ति. काबरे विद्यालय हे एरंडोल परिसरातील एक प्रमुख शैक्षणिक संस्थान असून, अशा कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळते, असे मुख्याध्यापकांनी सांगितले.



