शेठ ला ना. सार्व. विद्यालयात माता पालक संघातर्फे मातृ प्रबोधन आणि हळदी कुंकू कार्यक्रम उत्साहात साजरा.

जळगाव येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ सार्वजनिक विद्यालयात माता पालक संघातर्फे संक्रांत सणानिमित्त हळदी कुंकू कार्यक्रम व मातृप्रबोधन कार्यक्रम शुक्रवार दिनांक 23 जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सनातन धर्म प्रसारक सौ.क्षिप्रा प्रशांत जुवेकर तसेच संस्थेच्या मुख्य समन्वयिका सौ .पद्मजाताई अत्रे,समन्वयिका सौ.विजयालक्ष्मी परांजपे,सौ.रेवती शेंदुर्णीकर,पर्यवेक्षिका सौ रमा तारे उपस्थित होत्या. या कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रमुख अतिथींच्या हस्ते माता सरस्वती देवतेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन अतिथींचे यथोचित स्वागत करण्यात आले. या वेळेस प्रमुख अतिथी तथा व्याख्याता सौ.क्षिप्रा जुवेकर यांनी उपस्थित माता पालिकांना विद्यार्थी संस्काराविषयी विविध स्लाइड,व्हिडिओच्या सहायाने एल .सी.डी.प्रोजेक्टर द्वारे प्रभावी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे अध्यक्षीय स्थान संस्थेच्या शेठ ला.ना. सार्वजनिक विद्यालयाच्या समन्वयिका सौ विजयालक्ष्मी परांजपे यांनी भूषविले. मातृ प्रबोधन कार्यक्रमास जवळजवळ २५० पालिका भगिनी उपस्थित होत्या.
तसेच सर्व शिक्षिका भगिनींनी देखील या कार्यक्रमास सहकार्य केले. कार्यक्रमाचे प्रमुख सौ .रोहिणी प्रचंड यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला तर सूत्रसंचालन सौ मनीषा वानखेडे यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन सौ. योगिता गवलकर यांनी केले .हा कार्यक्रम यशस्वी करण्यास शाळेचे मुख्याध्यापक श्री सचिन देशपांडे , उप मुख्याध्यापक श्री प्रशांत जगताप, ज्येष्ठ पर्यवेक्षक श्री संजय वानखेडे, पर्यवेक्षिका सौ रमा तारे यांनी मार्गदर्शन व सहकार्य केले.




