लोकल न्यूज़
Trending
अनोरे येथील दोन सुपुत्रांची सैन्यदलात निवड; महिला पतसंस्थेकडून जवानांचा भव्य सत्कार

अनोरे प्रतिनिधी – लक्ष्मण बाविस्कर (महाजन)
अनोरे गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवत, गावातील दोन तरुणांची नुकतीच देशसेवेसाठी निवड झाली आहे. श्री. दीपक लोटन पाटील यांचे सुपुत्र चि. कल्पेश दीपक पाटील यांची सीमा सुरक्षा दल (BSF) मध्ये, तर कै. मुकेश राजाराम पाटील यांचे सुपुत्र चि. चेतन मुकेश पाटील यांची केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) मध्ये नियुक्ती झाली आहे. या दैदिप्यमान यशाबद्दल अनोरे महिला ग्रामीण बिगर शेती सह. पतसंस्था मर्या. अनोरे यांच्या वतीने या दोन्ही नवजवानांचा सत्कार करून त्यांना सन्मानित करण्यात आले.
अनोरे महिला पतसंस्थेच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात संस्थेचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सचिव तसेच सर्व संचालक मंडळाच्या उपस्थितीत कल्पेश आणि चेतन यांचा यथोचित गौरव करण्यात आला. ग्रामीण भागातील मुलांनी कठोर परिश्रमाच्या जोरावर सैन्यदलात मिळवलेले हे स्थान संपूर्ण गावासाठी अभिमानास्पद ठरले आहे.
अनोरे गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवत, गावातील दोन तरुणांची नुकतीच देशसेवेसाठी निवड झाली आहे. श्री. दीपक लोटन पाटील यांचे सुपुत्र चि. कल्पेश दीपक पाटील यांची सीमा सुरक्षा दल (BSF) मध्ये, तर कै. मुकेश राजाराम पाटील यांचे सुपुत्र चि. चेतन मुकेश पाटील यांची केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) मध्ये नियुक्ती झाली आहे. या दैदिप्यमान यशाबद्दल अनोरे महिला ग्रामीण बिगर शेती सह. पतसंस्था मर्या. अनोरे यांच्या वतीने या दोन्ही नवजवानांचा सत्कार करून त्यांना सन्मानित करण्यात आले.
अनोरे महिला पतसंस्थेच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात संस्थेचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सचिव तसेच सर्व संचालक मंडळाच्या उपस्थितीत कल्पेश आणि चेतन यांचा यथोचित गौरव करण्यात आला. ग्रामीण भागातील मुलांनी कठोर परिश्रमाच्या जोरावर सैन्यदलात मिळवलेले हे स्थान संपूर्ण गावासाठी अभिमानास्पद ठरले आहे.यावेळी पतसंस्थेच्या वतीने जवानांना शुभेच्छा देताना पदाधिकारी म्हणाले की, “आमच्या गावातील या तरुणांनी देशसेवेचे व्रत स्वीकारून अनोरे गावाचे नाव उंचावले आहे. या नवजवानांना त्यांच्या कार्यात अखंड यश प्राप्त होवो आणि त्यांच्या हातून देशाची सेवा घडो, हीच आमची सदिच्छा.”
या सत्कार समारंभाप्रसंगी पतसंस्थेचे सर्व सदस्य, कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सैन्यदलात निवड झालेल्या या दोन्ही सुपुत्रांवर सध्या पंचक्रोशीतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.