युवालोकल न्यूज़

शेठ ला.ना.सा. विद्यालयात इयत्ता 10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्ड परीक्षक/नियामकांची व्याख्यानमाला उत्साहात संपन्न.

जळगाव : शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ ला.ना.सा. विद्यालयात इयत्ता 10 वीच्या विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेत उत्तम यश मिळावे या उद्देशाने आयोजित करण्यात आलेली तज्ञ मार्गदर्शकांची व्याख्यानमाला उत्साहात पार पडली. इयत्ता 10 वीचे सर्व विषय शिकविणारे अनुभवी शिक्षक, बोर्ड परीक्षक व नियामक यांच्या उपस्थितीत ही व्याख्यानमाला ज्ञानवर्धक ठरली.

कार्यक्रमाची सुरुवात शाळेचे मुख्याध्यापक तथा नियामक सचिन देशपांडे व प्रमुख व्याख्यात्यांच्या हस्ते सरस्वती देवीचे पूजन व पुष्पहार अर्पण करून झाली. मुख्याध्यापक देशपांडे यांनी विद्यार्थ्यांना योग्य अभ्यास पद्धती, वेळेचे नियोजन आणि आत्मविश्वास वाढविण्याबाबत मार्गदर्शन केले. उपमुख्याध्यापक प्रशांत जगताप यांनी व्याख्यानमालेचे उद्दिष्ट स्पष्ट करून विद्यार्थ्यांना नियोजनबद्ध अभ्यासाचे महत्त्व पटवून दिले. ज्येष्ठ पर्यवेक्षक संजय वानखेडे यांनी उपक्रमाचे शैक्षणिक महत्त्व सांगत विद्यार्थ्यांना उज्ज्वल यशाच्या शुभेच्छा दिल्या.

व्याख्यानमालेतील पहिला पुष्प शाळेच्या पर्यवेक्षिका रमा तारे यांनी गुंफला. त्यांनी इंग्रजी विषयातील पेपर कसा सोडवावा, उत्तरलेखनातील मुद्देसूदपणा व अपेक्षित लेखन कौशल्य याबाबत मार्गदर्शन केले.

यानंतर विषयवार तज्ञ मार्गदर्शकांनी सखोल विवेचन केले :

  • मराठी – नियामक वंदना तायडे
  • हिंदी – नियामक अविनाश संदानशिव
  • संस्कृत – नियामक सीमा भारंबे
  • गणित – परीक्षक सुशील झोपे
  • इतिहास – परीक्षक निर्मल चतुर
  • भूगोल – मुख्याध्यापक तथा नियामक सचिन देशपांडे

मार्गदर्शकांनी प्रश्नपत्रिकेची रचना, महत्त्वपूर्ण अध्याय, संकल्पनांची मांडणी, नकाशा-आकृत्यांचे सादरीकरण, गणितीय सूत्रांचे आकलन, प्रयोगांचे महत्त्व, व्याकरण, पत्रलेखन, निबंधलेखन तंत्र, तसेच उत्तरलेखनाची परिणामकारक पद्धत याबाबत विद्यार्थ्यांना उपयुक्त सूचना दिल्या. विद्यार्थ्यांनीही या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध शंकांचे निरसन करून घेतले.

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी व्याख्यानमाला प्रमुख प्राजक्ता गोहिल, ज्येष्ठ शिक्षक ए. व्ही. चौधरी, जे. आर. साळुंखे, तसेच इयत्ता 10 वीचे विषय शिक्षक रोहिणी प्रचंड, मिलिंद देशपांडे, आनंद पाटील, संगीता पानट, पी. आर. सोनवणे, पी. एम. खंडाळे यांचे विशेष सहकार्य लाभले. शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी दिलेल्या योगदानामुळे ही व्याख्यानमाला अत्यंत यशस्वी ठरली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!