महाराष्ट्रलोकल न्यूज़
Trending

जिपीएस मित्र परिवार आयोजित नेत्र तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; ८१० रुग्णांची तपासणी, २३० मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड

पाळधी प्रतिनिधी/ मा. ना. गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जि. प. सदस्य प्रतापराव पाटील व विक्रम पाटील यांच्या पुढाकारातून जिपीएस मित्र परिवारतर्फे आयोजित करण्यात आलेल्या भव्य नेत्र तपासणी व मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिराला रविवारी नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. 

पहाटेपासूनच नागरिकांची शिबिरस्थळी गर्दी सुरू झाली होती. सकाळी सातपासून नोंदणीला सुरुवात झाली आणि दिवसभरात तब्बल ८१० रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली. त्यापैकी २३० रुग्णांची मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड होऊन त्यांना पनवेल येथील शंकरा नेत्र रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले.

शिबिरामध्ये रुग्ण नोंदणी, तपासणी, निदान ते शस्त्रक्रियेसाठी निवड अशा सर्व टप्प्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. उपस्थित नागरिकांसाठी मोफत नाश्ता, जेवण आणि प्रवास सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. सर्व सेवा पूर्णपणे विनामूल्य असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

‘दृष्टीदान’ या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून अनेक ज्येष्ठ नागरिकांनी व रुग्णांनी आयोजकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. समाजोपयोगी कार्यात सातत्य राखणारे गुलाबराव पाटील, प्रतापराव पाटील व विक्रम पाटील यांच्या प्रयत्नांचे उपस्थितांकडून विशेष कौतुक करण्यात आले.

या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी शंकरा हॉस्पिटलची तज्ञ टीम, डॉ. राहुल चौधरी, डॉ. विजय ब्राम्हणे, असद अन्वर, सायली उटेकर, वैशाली राऊत, पाळधी व चांदसर आरोग्य केंद्रातील कर्मचारी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय चव्हाण, डॉ. निखिल शिंदे, डॉ. ऋषिकेश झंवर, डॉ. प्रीती पाटील, संदीप पाटील, हर्ष भट, रिकुल चव्हाण तसेच जिपीएस मित्र परिवार, शिवसेना आणि युवासेना कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

जलपुरवठा क्षेत्रातील कार्यामुळे ‘पाणीवाला बाबा’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या नेत्यांची आता नागरिकांमध्ये ‘दृष्टी देणारा बाबा’ म्हणूनही नवी प्रतिमा निर्माण होत असल्याचे उपस्थितांचे मत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!