चर्मकार विकास संघातर्फे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुण्यतिथी उत्साहात साजरी


जळगाव | चर्मकार विकास संघाच्या वतीने भारतरत्न तसेच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी शनिवार, ६ डिसेंबर रोजी 257, भास्कर मार्केट, जळगाव येथे चर्मकार बांधवांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात ज्येष्ठ समाजबांधव श्री. काशीनाथ इंगळे, श्री. ज्ञानदेव भारुडे, श्री. प्रकाश रोजतकर, श्री. विश्वनाथ सावकारे, श्री. संजय वानखेडे सर, श्री. राजेश वाडेकर सर यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून झाली. त्यानंतर उपस्थितांनी पुष्पांजली अर्पण करत महानायक डॉ. आंबेडकर यांना विनम्र अभिवादन केले.
या प्रसंगी समाजबांधवांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि राष्ट्रनिर्मितीतील योगदानांची उजळणी केली. त्यांच्या “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” या मूलमंत्राचे पालन करून समाजविकासाची दिशा घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले.
कार्यक्रमाला श्री. लिलाधर भारुळे, श्री. मनोजकुमार सोनवणे, श्री. कैलास वाघ, श्री. रवींद्र नेटके, श्री. शिवदास कळसकर, श्री. रघुनाथ डोळे, श्री. यशवंत सावकारे, श्री. बाबू खाटिक, श्री. गुलाब पाटील, श्री. संतोष माळी आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
हा सामाजिक उपक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. काशीनाथ इंगळे, श्री. संजय वानखेडे सर, श्री. विश्वनाथ सावकारे, श्री. गुलाब पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.




