
धरणगाव : प्रतिनिधी रवींद्र निकम
तालुक्यातील धरणगाव–चोपडा रस्त्यावर असलेल्या शासकीय आयटीआयजवळ स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवार, दि. ३ डिसेंबर २०२५ रोजी रात्री सुमारे ८ वाजेच्या सुमारास मोठी कारवाई करत जवळपास १० किलो गांजा जप्त केला. या प्रकरणी धरणगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. पथकात धरणगाव पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक सुनील पवार, पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार, हेडकॉन्स्टेबल विष्णू बिऱ्हाडे, पोलीस कॉन्स्टेबल दीपक माळी, रवींद्र पाटील, सुधीर चौधरी, संदीप पाटील आणि किशोर भोई यांचा समावेश होता.स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे संशयितांना घेराबंदी करून ही कारवाई केली.

जप्त केलेल्या गांज्याचे प्रमाण मोठे असल्याने पुढील तपासात आणखी अनेक धागेदोरे मिळण्याची शक्यता असल्याचे पोलीस सूत्रांकडून समजते.
धरणगाव पोलीस स्थानकात रात्री उशिरा या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. पुढील तपास सुरु आहे.




