सुपोषित जळगाव अभियानांतर्गत पाळधी बु येथे ‘यंग इंडिया फिट इंडिया’ सायकल रॅलीचे आयोजन.

पाळधी बु (ता. धरणगाव) :
मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या ‘यंग इंडिया फिट इंडिया’ या संकल्पनेतून जिल्हा परिषद जळगावच्या मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीनल करणवाल मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणाऱ्या ‘सुपोषित जळगाव अभियान’ या महत्वाकांक्षी उपक्रमाची सुरुवात आज दिनांक १ नोव्हेंबर २०२५ (शनिवार) रोजी करण्यात आली.
या अभियानांतर्गत दर शनिवारी जिल्ह्यातील दत्तक गावांमध्ये विविध आरोग्यविषयक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्या अनुषंगाने जळगाव जिल्हा आरोग्य अधिकारी मा. श्री. सचिन भायेकर, धरणगाव तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय चव्हाण, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र पाळधी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. ऋषिकेश झवर यांच्या मार्गदर्शनाखाली पाळधी बु गावाची निवड अभियानासाठी करण्यात आली आहे.
ग्रामस्थांना निरोगी व आरोग्यदायी ठेवण्याच्या उद्देशाने या उपक्रमांतर्गत आज सकाळी ठीक ९:३० वाजता सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीला किशोरवयीन मुला-मुलींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
सदर रॅलीचे उद्घाटन गावाचे लोकनियुक्त सरपंच बापूसाहेब विजय पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी मा. पालकमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक श्री. बंडू नारखेडे, श्री. गोकुळ पाटील, उपसरपंच निसार शेठ, ग्रामविकास अधिकारी श्री. दीपक पाठक, क्लर्क शिवाजी पाटील, माजी सरपंच श्री. अरुण पाटील उपस्थित होते.
कार्यक्रमास डॉ. सायमा खान, आरोग्य सेवक अतुल नन्नावरे, नितीन सोनवणे, आरोग्य सेविका चेतना पाटील, निलीमा तावडे, तसेच आरोग्य सहाय्यक अनिल महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमातून ग्रामस्थांना नियमित व्यायाम, योग्य आहार व आरोग्याबाबत जागरूक राहण्याचा संदेश देण्यात आला.




