लोकल न्यूज़

अनोरे महिला पतसंस्थेचा दिमाखदार शुभारंभ.

अनोरे (ता. धरणगाव): प्रतिनिधी – लक्ष्मण बाविस्कर (महाजन)

महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या उद्देशाने स्थापन झालेल्या ‘अनोरे महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित, अनोरे’ या संस्थेचा भव्य शुभारंभ सोमवार, दि. १३ ऑक्टोबर २०२५ रोजी सायं. ६ वाजता उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाचे उद्घाटन संसदरत्न खासदार स्मिताताई वाघ तसेच पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आदरणीय स्मिताताई वाघ यांनी भूषवले.

⭐ प्रमुख पाहुणे ⭐

या प्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यामध्ये —

सामाजिक कार्यकर्ते भगवानभाऊ महाजन, माजी जि.प. सदस्य प्रतापराव पाटील, माधुरीताई अत्तरदे (हिंगलाज माता पतसंस्था), मॅनेजर उमेशदादा चौधरी, भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, उपजिल्हाध्यक्ष आबासाहेब पी.सी. पाटील व संजय महाजन, उद्योजक हरिषशेठ डेडिया, मा. सभापती जिजाबराव पाटील, भाजपा तालुका प्रमुख दिनेशदादा पाटील, उपाध्यक्ष कैलास माळी सर, गुलाबभाऊ मराठे, जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाणे साहेब, सहाय्यक निबंधक विशाल ठाकूर साहेब, तहसीलदार धरणगाव महेंद्र सूर्यवंशी साहेब, पोलीस निरीक्षक सुनील पवार साहेब, प. स. एरंडोल इं. हर्षलदादा माने, ई.डी.सि.बी. आय. राजेंद्र आर. भटनागर साहेब, एम.आर.एसि. चेअरमन मिलिंददादा पाटील, जिल्हा सचिव कन्हेया रायपूरकर, शहराध्यक्ष दिलिप महाजन, ललित वाणी, प्रमिलाताई रोकडे, दिक्षाताई, तसेच भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादीचे पदाधिकारी, गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि पंचक्रोशीतील मान्यवर उपस्थित होते.

यशस्वी आयोजन

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेच्या चेअरमन सुरेखाबाई संतोष चौधरी, उपाध्यक्ष सुवर्णा नंदलाल पाटील, सचिव मनीषा हरी महाजन आणि सर्व संचालिका मंडळ यांनी अथक परिश्रम घेतले.

कार्यक्रमाला अनोरे हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक एम.एच. चौधरी सर, सरपंच स्वप्निलभाऊ महाजन, पोलीस पाटील भाऊसाहेब पाटील, तसेच ग्रामस्थ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित राहिली.

या शुभारंभ सोहळ्याने महिलांच्या आर्थिक प्रगतीस नवे बळ मिळेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!