लोकल न्यूज़

तेवीस वर्षापूर्वी उडालेली पाखरे पुन्हा परतली.

इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय येथे २००१-०२ वर्षातील १०वी च्या विद्यार्थिनींचा स्नेहमेळावा संपन्न.

धरणगाव : तालुक्यातील इंदिरा गांधी माध्यमिक व त्याकाळाची इंदिरा गांधी कन्या विद्यालयात २००१-०२ वर्षातील इयत्ता १० वी च्या विद्यार्थिनींचा स्नेहमेळावा जुन्या आठवणींना उजाळा देऊन नवे ऋणानुबंध बळकट करत संपन्न झाले.

तेवीस वर्षांपूर्वी दहावी नंतर शाळा सोडून गेलेले एकूण ३५ विदयार्थीनी पुन्हा स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने एकत्र आले. शालेय वातावरणात रममाण होऊन त्यावेळेचे वर्गशिक्षक ए.एस.पाटील यांच्या हातून छड्या घेऊन आठवणींना उजाळा देत वर्गात प्रवेश केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव सी.के. पाटील होते.तर प्रमुख पाहुण्या म्हणून प्राचार्या एस.एस.पाटील ह्या मंचावर विराजमान होत्या विद्यार्थ्यांनी प्रमुख अतिथींचा व प्रत्येक शिक्षकांचा भेटवस्तू देऊन सन्मान व सत्कार केला.सर्व माजी विद्यार्थिनींनी शाळा सुरु होण्याच्या अगोदर या विद्यालयात त्यावेळी कार्यरत असलेले व सध्या हयात नसलेले शिक्षक स्व.पी.डी.धनगर,शिक्षिका स्व.प्रतिभा बिऱ्हाडे व त्यावेळेस नाईक पदावर कार्यरत असलेले स्व.रविभाऊ पाटील यांना आदरांजली वाहिली व तद्नंतर विद्यार्थ्यांची प्रार्थना, व राष्ट्रगीत घेतले व वर्गात जाऊन हजेरी घेतली. एकमेकांचा परिचय देऊन तेवीस वर्षात आलेल्या सुखद आणि दुःखद प्रसंग , विचारांची देवाणघेवाण करण्यात आली. शालेय जीवनातील मैत्री पुन्हा घट्ट करण्यासाठी भावी आयुष्यात एकमेकांना सहकार्य आणि संकटात मदत करण्याचे आश्वासन दिले. यावेळी सेवानिवृत्त पर्यवेक्षक आर.एस.पडोळ,प्राचार्या एस.एस.पाटील या शिक्षकांनी तर योगिता चौधरी, दिपाली पाटील,मयुरी चंदेल, रुपाली पाटील,सुनीता पाटील
यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत मनोगत व्यक्त केले.
या स्नेहमेळाव्यासाठी त्यावेळेस कार्यरत असलेले व सध्या सेवानिवृत्त असलेले शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, आर.एस.पडोळ,पी.एम.पाटील, जे.पी.निकुंभ, डी.एम.पाटील, आर.पी.पाटील, एन.बी.पाटील हे शिक्षक तर डी.एस.वाणी, टी.जी.चंदेल, चंद्रकला जैन हे शिक्षकेतर कर्मचारी आपल्या आवडत्या विद्यार्थिनींना भेटण्यासाठी आवर्जून उपस्थित होते या विद्यालयातील जेष्ठ सेवानिवृत्त शिक्षिका मिनाक्षी जोशी व शोभना कुलकर्णी या वयोवृद्ध असल्याने त्यांनी व्हाट्सएपच्या माध्यमातून विद्यार्थिनींशी हितगुज करून शुभेच्छा दिल्या आहेत.या कार्यक्रमाला व्यस्ततेच्या कारणामुळे उपस्थित राहू न शकलेले विद्यालयाचे चेअरमन डी.जी.पाटील यांनी भ्रमणध्वनी द्वारे शुभेच्छा दिल्या.या स्नेहमेळाव्याप्रसंगी विद्यार्थिनींनी नेहमी होणाऱ्या शालेय कार्यक्रमासाठी लागणारे संपूर्ण अद्ययावत साऊंड सिस्टीम चा सेट विद्यालयाचा भेट दिला.
अध्यक्ष भाषणात सी.के.पाटील यांनी जुन्या आठवणीना उजाळा देत इवल्याशा रोपाचे वटवृक्षात कसे रूपांतर झाले याची विस्तृत माहिती दिली
कार्यक्रमाची प्रस्तावना अनिता कंखरे ह्या विद्यार्थिनींने केली,सूत्रसंचालन सपना बयस यांनी केली तर आभार सुनीता गोकुळ पाटील यांनी मानले
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी वृंदानी मेहनत घेतली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!