श्रीमद संगीतमय भागवत सप्ताह उत्साहात संपन्न.

धरणगाव येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र येथे दिनांक 1 सप्टेंबर 25 ते 7 सप्टेंबर २५ या कालावधीत श्रीमद सुलभ भागवत पारायण तसेच श्रीमद् भागवत कथा निरुपण अतिशय आनंद व भक्तिमय वातावरणात उत्साहात हजारो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
दिनांक 31 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 2 ते 6 वाजे दरम्यान श्रीमद् भागवत महामिरवणुक श्री बालाजी मंदिरापासून सुरुवात होऊन गावातून श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र येथे संध्याकाळी 6 वाजता महाआरती करण्यात आली.
श्रीमद् भागवत सप्ताहातील दैनंदिन विशेष सेवा व उपक्रम पुढील प्रमाणे होते 1 सप्टेंबर 25 रोजी ते 7 सप्टेंबर 25 रोजी सकाळी सहा वाजता सामुदायिक श्रीमद् भागवत पारायण वाचन तसेच दुपारी 2 ते 6 श्रीमद् भागवत संगीतमय निरूपण व महाआरती सत्ताह काळात जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केंद्रात येवून सदिच्छा भेट दिली. सत्ता काळात निरूपणाचे कथेचे विषय थोडक्यात ह भ प श्री वाल्मिक महाराजांनी आपल्या अमृततुल्यवाणीतून केले असे कथा शुभारंभ गोकर्ण महात्मा नारद चरित्र परिक्षित जन्म भीष्म स्तुती परीक्षेत दिग्विजय कदर्म चरित्र कपिल उपाख्यान सती चरित्र ध्रुवचरित्र भरत उपाख्यान अजामील उपाख्यान वामन अवतार प्रल्हाद चरित्र गजेंद्र मोक्ष समुद्रमंथन श्री राम जन्म कृष्णवतार ननंद उत्सव बाललीला पुतना उद्धार श्रीकृष्ण चरित्र अमृत एवंम गोवर्धन पूजा मथुरा गमन गोपी उद्धव संवाद एवं रुक्मिणी विवाह देवाचे अनेक विवाहाचे वर्णन परीक्षेत मोक्ष सुदामा चरित्र इत्यादी विषयांवर संगीतमय निरूपण करण्यात आले.
7 सप्टेंबर 25 रोजी दुपारी 12 वाजता श्रीमद् भागवत निरूपण तसेच 4 वाजता दहीकाला व किर्तन व महा आरती प्रसाद वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली हा सप्ताह यशस्वी साठी श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रातील सेवेकऱ्यांनी परिश्रम घेतले.




