इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांना “भारत को जानो” स्पर्धेत द्वितीय क्रमांक

धरणगाव (ता. धरणगाव), दि. 20 सप्टेंबर – भारत विकास परिषदेतर्फे आज आयोजित “भारत को जानो” व राष्ट्रीय समूह गान या प्रतिष्ठित स्पर्धेत इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल, पाळधी येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले.
भारत को जानो प्रश्नमंजुषा स्पर्धेत (मोठा गट) शाळेतील यश मनोहर चौधरी व धन्वी योगेश बडगुजर यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. या स्पर्धेत लहान गट व मोठा गट मिळून सुमारे 30 शाळांचा सहभाग होता. विद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृती, इतिहास, भूगोल व समाजजीवन या विषयांवरील ज्ञान प्रभावीपणे सादर करून परीक्षकांची मनं जिंकली.
तसेच समूह गान स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते सादर करून प्रेक्षकांमध्ये देशप्रेमाची भावना जागवली व एकात्मतेचा संदेश दिला.
या यशामागे शाळेचे चेअरमन इंजी. नरेश चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच शाळेचे एम.डी. श्री. जी. डी. पाटील, प्राचार्य, शिक्षक व पालक वर्ग यांनी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. विद्यार्थ्यांच्या घडवणुकीत शाळेच्या शिक्षिका सौ. रोहिणी सोमानी यांचा मोलाचा वाटा असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.




