लोकल न्यूज़

इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल, पाळधी येथे शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांचा गौरव सोहळा संपन्न.

दि. 08 सप्टेंबर 2025, सोमवार रोजी इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल, पाळधी येथे शिक्षक दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षकांचा गौरव व कौतुक सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने आणि डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना नमन करून झाली. विद्यार्थ्यांनी नृत्य, नाटिका इ. सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून शिक्षकांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली. विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे आदर्श व त्यांच्या मार्गदर्शनाचे महत्त्व प्रभावीपणे मांडले.
प्रसंगी शाळेचे चेअरमन इंजि. श्री. नरेश चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली आणि या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणारे श्री. चंद्रकांत भंडारी सर यांच्या उपस्थितीत पार पडला. कार्यक्रमात शाळेचे कार्यकारी संचालक श्री. जी. डी. पाटील, प्राचार्य श्री. विवेक रुपनर आणि सर्व शिक्षक उपस्थित होते.

प्रमुख पाहुणे श्री चंद्रकांत भंडारी यांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितले की, “शिक्षक हा समाजाचा शिल्पकार असून त्यांच्या मार्गदर्शनामुळेच विद्यार्थी जीवनात यशस्वी होतात.” यावेळी शिक्षकांचा पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व विद्यार्थी यांनी उत्साहाने सहभाग घेतला. शेवटी आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!