लोकल न्यूज़

हिंगलाज माता मंदिराच्या वर्धापनदिनानिमित्त धरणगाव येथे गुणगौरव सोहळा

धरणगाव (प्रतिनिधी) : अखिल महाराष्ट्र भावसार क्षत्रिय समाजाच्या “आपल्या दारी” या उपक्रमांतर्गत हिंगलाज माता मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त धरणगाव येथे विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा पार पडला.

या कार्यक्रमास अखिल महाराष्ट्र भावसार समाजाचे अध्यक्ष अरुण भावसार, सहसचिव चंद्रशेखर भावसार, कार्याध्यक्ष सुभाष झेंडू भावसार तसेच सदस्य मनोहर गुरुदास भावसार यांनी उपस्थित राहून दहावी, बारावी आणि बी.टेक उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला.

यावेळी धरणगाव भावसार समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत सुभाष भावसार व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन भावसार यांनी केले. प्रस्तावना सौ. अलका भावसार यांनी सादर केली तर आभार प्रदर्शन सौ. कावेरी भावसार यांनी केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संजय भावसार, राहुल भावसार व सुमित भावसार यांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!