महाराष्ट्रलोकल न्यूज़

उधना–पुरी एक्सप्रेसला अमळनेर थांबा मंजूर : धरणगावकरांना थांब्याची अपेक्षा

खान्देशमधील रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची आनंदवार्ता समोर आली आहे. 08471/72 उधना–पुरी एक्सप्रेस या नवीन गाडीला अमळनेर येथे थांबा मंजूर करण्यात आला आहे.

या निर्णयाबद्दल खान्देशचे लोकप्रिय खासदार मा. स्मिता वाघ यांचे खान्देश प्रवासी असोसिएशनतर्फे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहेत.

दरम्यान, याच गाडीला तसेच इतर हॉलिडे एक्सप्रेस गाड्यांना धरणगाव येथेही थांबा मिळावा अशी मागणी स्थानिक प्रवाशांकडून होत आहे. यासंदर्भात खासदार स्मिता वाघ यांना निवेदन देण्यात आल्याचे खान्देश प्रवासी असोसिएशनचे  प्रतिक जैन (ZRUCC, WR) यांनी सांगितले.

नवीन गाडी 23 सप्टेंबरपासून धावणार असून प्रवाशांना सोयीसाठी तिकीट बुकिंग 12 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!